एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : फ्रान्सची पेरुवर मात, बाद फेरीचं तिकीट कन्फर्म
रशिया आणि उरुग्वेपाठोपाठ विश्वचषकाची बाद फेरी गाठणारा फ्रान्स हा तिसरा संघ ठरला आहे.

रशिया : फ्रान्सनं पेरूचा १-० असा पराभव करून, रशियातल्या फिफा विश्वचषकात सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयानं फ्रान्सला क गटातून विश्वचषकाच्या बाद फेरीचं तिकीटही मिळवून दिलं.
रशिया आणि उरुग्वेपाठोपाठ विश्वचषकाची बाद फेरी गाठणारा फ्रान्स हा तिसरा संघ ठरला आहे. फ्रान्सनं सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर २-१ अशी मात केली होती. त्यापाठोपाठ फ्रान्सनं पेरूचा १-० असा पराभव केला.
एकोणीस वर्षांच्या किलियन एमबापेचा गोल फ्रान्सच्या या विजयात निर्णायक ठरला. एमबापेनं वयाच्या १९ वर्षे आणि १८३ दिवशी विश्वचषकात गोल नोंदवून, फ्रान्सच्या इतिहासात स्थान मिळवलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
