एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : फ्रान्सची विजयी सलामी, ऑस्ट्रेलियावर मात
पोग्बाच्या या गोलवर चेंडू साईडबारवर आदळून गोलपोस्टमध्ये गेला आणि पुन्हा बाहेर आला. पण गोललाईन तंत्रज्ञानानं फ्रान्सच्या दुसऱ्या गोलवर शिक्कामोर्तब केलं.
रशिया : फ्रान्सनं ऑस्ट्रेलियाचं आव्हान 2-1 असं मोडीत काढून, रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या क गटात विजयी सलामी दिली. हा सामना संपायला नऊ मिनिटांचा अवधी असताना फ्रान्सच्या पॉल पोग्बानं डागलेला गोल निर्णायक ठरला.
पोग्बाच्या या गोलवर चेंडू साईडबारवर आदळून गोलपोस्टमध्ये गेला आणि पुन्हा बाहेर आला. पण गोललाईन तंत्रज्ञानानं फ्रान्सच्या दुसऱ्या गोलवर शिक्कामोर्तब केलं.
फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियानं आपापला पहिला गोल हा पेनल्टीवरच नोंदवला. अॅन्टॉईन ग्रिझमननं 51 व्या मिनिटाला फ्रान्सचं, तर माईल जेडिनाकनं 62 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचं खातं उघडलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement