एक्स्प्लोर
इंग्लंडचा 5 धावांनी विजय, मालिका मात्र टीम इंडियाच्या खिशात
कोलकाता : कोलकाता वन डेमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. इंग्लंडने 5 धावांनी भारतावर विजय मिळवला आहे. मात्र टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली.
इंग्लंडनं 50 षटकांत 8 बाद 321 धावा करुन भारताला विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना केदार जाधव पुन्हा एकदा हिरो ठरला. एकाकी झुंज देत केदारने 75 चेंडूंमध्ये 12 चौकार ठोकत 90 धावांची खेळी केली.
तुफान फलंदाजी करणारा केदार जाधव अवघा एक चेंडू बाकी असताना बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची गरज होती, मात्र भुवनेश्वर विजयाचा शिल्पकार ठरु शकला नाही.
कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतक ठोकलं, तर युवराज सिंगनंही 45 धावांची खेळी केली. भारताचा निम्मा संघ 173 धावांत माघारी परतला. आर अश्विनही अवघी एक धाव करुन तंबूत परतला. त्यामुळे भारतीय फलंदाज विजयासाठी काहीसा संघर्ष करावा लागला.
ईडन गार्डन्सवरील या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्स या इंग्लंडच्या सलामीवीरांनी त्याचा पुरेपूर फायदा उठवत 98 धावांची भागीदारी रचली.
कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टोनं तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचली. तळाला बेन स्टोक्सनंही फटकेबाजी केली. भारताकडून हार्दिक पंड्यानं तीन तर रवींद्र जाडेजानं दोन विकेट्स काढल्या.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या वन डेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. या सामन्यात टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला होता. सलामीवीर शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली आहे.
भारत आणि इंग्लंड संघांमधला तिसरा आणि अखेरच्या वन डे सामना ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. पुणे आणि कटक वन डे नंतर कोलकात्यातही इंग्लंडला पराभवाची धूळ चारुन मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement