एक्स्प्लोर

वन डेत धोनीच्या 10 हजार धावा पूर्ण

यष्टिरक्षक या नात्यानं दहा हजार धावा करणारा धोनी जगातला केवळ दुसरा यष्टिरक्षक ठरला. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने दहा हजार धावा करणारा पहिला यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला होता.

लंडन : भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स वन डेत लियाम प्लंकेटच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत वन डे कारकीर्दीतल्या दहा हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा धोनी भारताचा चौथा तर जगातला बारावा फलंदाज ठरला. वन डेत दहा हजार धावा पूर्ण करत धोनीने त्याच्या यशस्वी कारकीर्दीतला एक मैलाचा दगड पार केला. भारताच्या वन डे क्रिकेटच्या इतिहासात धोनीच्याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने दसहजारी टप्पा ओलांडला होता. त्यात सचिननं 18 हजार चारशे सव्वीस, गांगुलीने 11 हजार 221 आणि द्रविडने 10 हजार 768 झळकावल्या आहेत. भारताच्या या रथीमहारथींच्या यादीत आता धोनीचा समावेश झाला आहे. यष्टिरक्षक या नात्यानं दहा हजार धावा करणारा धोनी जगातला केवळ दुसरा यष्टिरक्षक ठरला. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने दहा हजार धावा करणारा पहिला यष्टिरक्षक होण्याचा मान मिळवला होता. धोनीने आजवर 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 320 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. या कालावधीत धोनीने 51.57च्या सरासरीने 10,004 धावांचा रतीब घातला आहे. त्यात दहा शतकं आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे. केवळ फलंदाज म्हणून नव्हे तर भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही धोनीकडे पाहिलं जातं. धोनीनं 60 कसोटी,199 वन डे आणि 72 ट्वेन्टी ट्वेन्टीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. या कालावधीत धोनीनं 2007 साली भारताला  ट्वेन्टी ट्वेन्टीचा पहिला विश्वचषक मिळवून दिला. त्यानंतर 2011च्या वन डे विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 1983 नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावला. तर 2013ला चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करत आयसीसीच्या तिन्ही महत्वाच्या स्पर्धा जिंकून देणारा तो जगातला पहिला कर्णधार बनला. याशिवाय यष्टीरक्षक म्हणूनही धोनीने चारशे विकेट्सचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही वर्षात धोनीमधल्या आक्रमकतेची धग कमी झाली असली तरी त्याच्या फलंदाजीतलं सातत्य अजूनही कायम आहे. वयाच्या 37व्या वर्षीही त्याची धावा घेतानाची चपळाई युवा खेळाडूंनाही लाजवणारी ठरते. त्यामुळेच दस हजारी शिलेदारांच्या यादीत आज धोनीचा समावेश झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणारAnant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Embed widget