CWG 2022: पहिलीच कॉमनवेल्थ स्पर्धा अन् एकतर्फी विजय, मनिका बत्राची दमदार सुरुवात!
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे आजपासून सुरु झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे आजपासून सुरु झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं (Manika Batra) उत्कृष्ट कामगिरी करत जगावर छाप सोडली आहे. टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिकानं मुशफिकुह कलामला (Mushfiquh Kalam) पराभवाची धुळ चाखली. महत्वाचं म्हणजे, मनिका बत्रा पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धा खेळत असून तिच्याकडून भारताला पदक मिळण्याची अपेक्षा केली जात आहे.
मनिका बत्राचा एकतर्फी विजय
टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत मनिका बत्रानं मुशफिकुह कलामचा 11-5 अशा फरकानं पराभव केलाय. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये मनिका बत्रानं प्रतिस्पर्धी खेळाडू मुशफिकुह कलामवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आक्रमक खेळी करत मुशफिकुह कलामला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. ज्यामुळं दुसरा सेटही तिनं एकतर्फी जिंकला.
ट्वीट-
महिला दुहेरी स्पर्धेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
दरम्यान, महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय जोडी रिथ टेनिसन (Reeth Tennison) आणि श्रीजा अकुलानं (Sreeja Akula) दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स (Lailaa Edwards) आणि दानिशा पटेलला (Danisha Patel) पराभूत करत कॉमनवेल्थ मोहिमेची सुरुवात केली.
भारतासाठी पदक जिंकण्यासाठी खेळाडू सज्ज
भारतीय खेळाडू 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतलाय. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडलं आहे. भारतीय सदस्य येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी आहे.
हे देखील वाचा-