(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cristiano Ronaldo : स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो करतोय डान्स, पाहिला नसेल ख्रिस्तियानोचा हा अवतार, VIDEO पाहून चाहतेही चकीत
Cristiano Ronaldo Dance : जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या फॅमिलीसोबत सुट्टीवर असून
Cristiano Ronaldo : जगातील एक प्रसिद्ध खेळातील प्रसिद्ध खेळाडू म्हणजे पोर्तुगालचा फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo). आपल्या दमदार खेळाने अनेक विक्रमांना गवसणी घालणारा रोनाल्डो त्याच्या रॉयल लाईफमुळेही चर्चेत असतो. आता देखील तो स्पेनमध्ये सुट्टी घालवत असून तिथला एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो फॅमिलीसोबत डान्स आणि मजा-मस्ती करताना दिसत आहे.
एप्रिल आणि मेच्या अखेरीस सर्व प्रमुख फुटबॉल लीगचे सीजन संपतात. जुलैशिवाय पुन्हा सीजन सुरु होत नसतो. त्यामुळे अशा काळात सर्व फुटबॉलपटू सुट्टीवर असतात. त्यामुळे रोनाल्डोही सध्या समर ब्रेकवर स्पेनमधील एका बेटावर आहे. माजुरका बेटावर तो फॅमिलीसोबत सुट्टी एन्जॉय करत असून रोनाल्डो चक्क डान्स करत असल्याचं दिसून आलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रोनाल्डोचे चाहतेही यावर विविध कमेंट्स आणि लाईक्स ठोकत आहेत.
View this post on Instagram
रोनाल्डोच्या मालिकिच्या कारचा झाला अपघात
काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोच्या कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. रोनाल्डोचा एक कर्मचारी ही कार चालवत होता. परंतु, कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातामुळं कारचं मोठं नुकसान झालंय. महत्वाचं म्हणजे, कार चालकाला कोणतीही दुखापत न झाल्याचं ही समोर आलं. बुगाटी वेरॉन अशी ही कार असून स्पेनमध्येच कारचा अपघात झाला.
ख्रिस्तियानो रोनाल्डो कमाल फॉर्ममध्ये
पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रोफेशनल फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. रोनाल्डोनं यावर्षी जोसेफ बीकनला (805 गोल) मागं टाकलं होतं. ज्यानं फिफा रेकॉर्डनुसार एकूण 805 गोल केले होते. एवढेच नाही तर. रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे.
हे देखील वाचा-
- Cristiano Ronaldo Car Accident: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कारला अपघात, कोटींचं नुकसान, थोडक्यात वाचला जीव!
- Cristiano Ronaldo: 'आय एम नॉट फिनिश' ब्रेंटफोर्डविरुद्द ख्रिस्तियानो रोनाल्डोची दमदार कामगिरी
- David Warner: ऐकत नाही भाऊ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वार्नरच्या 16000 धावा, दिग्गजांच्या पंक्तीत स्थान!