IND vs ENG: राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराटला फक्त 101 धावांची गरज
IND vs ENG: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागतोय.
IND vs ENG: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीला दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय. ज्यामुळं इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीच्या खेळण्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. महत्वाचं म्हणजे, विराट कोहली इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळतोय तर, त्याच्याकडं राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडण्याची संधी असेल. इंग्लंडमध्ये भारताकडून एकदिवसीय सामन्यात राहुल द्रविडनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुल द्रविडचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत 101 धावा कराव्या लागतील.
इंग्लंडविरुद्ध त्यांच्या मायभूमीवर राहुल द्रविडनं 20 सामन्यात 648 धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिननं इंग्लंडमध्ये 17 सामने खेळले आहेत. ज्यात 639 धावा केल्या आहेत. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी 613 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सौरव गांगुली 565 तर, विराट कोहलीच्या नावावर 548 धावांची नोंद आहे. इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीनं 101 धावा केल्यास तो राहुल द्रविडला मागं टाकेल.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज-
क्रमांक | भारतीय फलंदाज | सामने | धावा |
1 | राहुल द्रविड | 20 | 648 |
2 | सचिन तेंडुलकर | 17 | 639 |
3 | महेंद्रसिंह धोनी | 21 | 613 |
4 | सौरव गांगुली | 16 | 565 |
5 | विराट कोहली | 14 | 548 |
विराटच्या खेळण्याबाबत शंका
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला दुखापत झालीय. विराट कोहलीला बर्मिंगहॅम येथे खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट खेळणार की नाही? हे काही वेळातच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-