(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवृत्तीनंतरही युवराज सिंहचा दबदबा, भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक; पाहा टॉप-5 फलंदाजांची यादी
भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील एकदिवसीय सामन्याला आजपासून सुरुवात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे खेळला जाणार आहे.
ENG vs IND: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यातील एकदिवसीय सामन्याला आजपासून सुरुवात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे खेळला जाणार आहे. इंग्लंड दोऱ्यावर भारतानं टी-20 मालिका जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदाच इंग्लंडशी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहचा (Yuvraj Singh) नेहमी दबदबा पाहायला मिळाला. भारत- इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाजाच्या यादीत युवराज सिंह अव्वल स्थानी आहे.
युवराज सिंह
भारत आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत युवराज सिंह अव्वल स्थानी आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात युवराज सिंहनं चार शतक झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याची फलंदाजीची सरासरीही 50 पेक्षा जास्त आहे.
विराट कोहली
विराट कोहली भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा दुसरा फलंदाज आहे. कोहलीनं इंग्लंडविरुद्धच्या 33 सामन्यांमध्ये तीन शतक झळकावली आहेत.
जो रूट
या यादीत विराट कोहलीसोबत जो रूटही आहे. त्यानं भारतीय संघाविरुद्ध केवळ 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन एकदिवसीय शतक झळकावली आहेत.
इयान बेल
या यादीत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेल चौथ्या क्रमांकावर आहे. बेलनं भारताविरुद्ध 31 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतक झळकावली आहेत.
सचिन तेंडूलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचाही या यादीत समावेश आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध दोन शतक झळकावली आहेत. सचिनसोबतच रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, ट्रेस्कोथिक आणि रॉबिन स्टिम यांनीही दोन्ही संघांमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन-दोन शतक झळकावली आहेत.
हे देखील वाचा-