ENG vs IND: भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात ॲंडरसनचे सर्वाधिक विकेट्स, पाहा टॉप-5 गोलंदाजांची यादी
ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून (12 जुलै 2022) सुरुवात होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतानं टी-20 मालिकेत इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर नमवलं.
ENG vs IND: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून (12 जुलै 2022) सुरुवात होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतानं टी-20 मालिकेत इंग्लंडच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर नमवलं. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खिशात घालण्याच्या उद्देशानं भारत मैदानात उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात नेहमीच रोमांच पाहायला मिळालाय. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात कोणत्या गोलंदाजांचा दबदबा राहिलाय? हे जाणून घेऊयात. तसेच दोन्ही संघाच्या गोलंदाजांनी एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी केली? हे देखील पाहुयात.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंडचा संघ आतापर्यंत 103 वेळा आमने सामने आले आहेत. यातील 55 सामने भारतानं तर, 43 इंग्लंडनं जिंकले आहेत. याशिवाय, दोन सामने अनिर्णित आणि तीन सामन्यांचा निकाल नाही लागला. भारत आणि इंग्लंड यांच्यात शेवटची एकदिवसीय मालिका 2021 मध्ये खेळली गेली होती. त्यावेळी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 2-1 नं विजय मिळवला होता.
भारत-इंग्लंड एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
1) जेम्स ॲंडरसन
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जेम्स ॲंडरसन अव्वल स्थानी आहे. त्यानं भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत 31 सामन्यात 40 विकेट्स घेतल्या आहेत.
2) अँड्र्यू फ्लिंटॉफ
या यादीत इंग्लंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफचा क्रमांक लागतो. भारताविरुद्ध 30 एकदिवसीय सामन्यात त्यानं 37 विकेट मिळवल्या आहेत.
3)रवींद्र जाडेजा
भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा इंग्लंडच्या संघासाठी मोठी अडचण ठरलाय. इंग्लंडविरुद्ध 22 एकदिवसीय सामन्यात रवींद्र जाडेजानं 37 विकेट्स घेतल्या आहेत.
4) हरभजन सिंह
या यादीत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात 36 विकेट्स घेतल्या आहेत.
5) रविचंद्रन अश्विन
भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत भारताचा फिरकीपटू आर अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 35 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-