ENG vs IND: सचिन- गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी रोहित- शिखरची जोडी उतरणार मैदानात!
ENG vs IND: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सलामी शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी भारताची सर्वात यशस्वी जोडी आहे.
ENG vs IND: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सलामी शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी भारताची सर्वात यशस्वी जोडी आहे. या दोन खेळाडूंच्या सलामीच्या जोडीनं अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. रोहित आणि धवन पुन्हा एकदा इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सलामी देताना दिसणार आहेत. शिखर धवन मागील काही दिवसांपासून भारतीय संघाचा भाग नव्हता. ज्यामुळं रोहित- शिखरची जोडी पाहायला मिळाली. परंतु, इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित- शिखरची जोडी इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
सचिन- गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी
मर्यादित षटकांमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनची सलामीची जोडी भागीदारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची जोडी आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी 136 डावांमध्ये 6 हजार 609 धावांची भागेदारी केली होती. तर रोहित आणि धवननं 111 डावात 4994 धावा केल्या आहेत. 6 धावा करताच या दोघांची जोडी एकदिवसीय सामन्यात 5000 धावा पूर्ण करेल. दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यानंतर भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांची भागेदारी करणारे रोहित- शिखरची दुसरी जोडी ठरेल.
क्रिकेटविश्वात शिखर- रोहितची जोडी चौथ्या क्रमांकावर
क्रिकेटविश्वात शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी चौथ्या क्रमांकावर पोहचेल. या यादीत वेस्ट इंडिजची सलामी जोडी गॉर्डन ग्रीननीड्स आणि डेसमंड हेन्सचे अव्वल स्थानी आहे. त्यांनी 102 डावात 5 हजार 150 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानं 114 डावात 5 हजार 472 धावा केल्या आहेत.
इंग्लडविरुद्ध एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात
टी-20 मालिकेनंतर भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडशी तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (England vs India ODI Series) खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल मैदानावर (Kennington Oval) खेळला जाईल. टी-20 टी-20 मालिकेत इंग्लंडवर मात केल्यानंतर एकदिवसीय मालिकेतही भारतीय संघ तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करेल.
हे देखील वाचा-