India Squad Champions Trophy : यशस्वी जैस्वालमुळे रोहित शर्माच्या खास खेळाडूचा पत्ता कट, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडीवरून BCCI समोर मोठा पेच
ICC Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.
Team India Squad For Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा एकाच वेळी होणार असल्याचे बोलल्या जात आहे. आता प्रश्न असा आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणते खेळाडू निवडले जातील? खरं तर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील फॉर्मच्या आधारावर निवड झाली, तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यापेक्षा यशस्वी जैस्वालला सलामीवीर म्हणून प्राधान्य मिळू शकते. यशस्वी जैस्वालने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या 10 डावांमध्ये 43.44 च्या सरासरीने आणि 53.41 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 391 धावा केल्या.
विराट कोहली आणि रोहित शर्मा याच काय होणार?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची निवड होईल, असे मानले जात आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला तर रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे फॉरमॅटमध्ये खेळतील. पण जर टीम इंडिया हरली तर निवडकर्ते दोन्ही खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेऊ शकतात. खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सपशेल फ्लॉप ठरले. तेव्हापासून या दोन्ही दिग्गजांच्या कारकिर्दीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
यशस्वी जैस्वालमुळे शुभमन गिलचा पत्ता होणार कट?
मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी यशस्वी जैस्वालची निवड निश्चित झाल्यामुळे या खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी संधी मिळू शकते, असे मानले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालची निवड झाल्यास शुभमन गिलला बाहेर बसावे लागू शकते. यशस्वी जैस्वालने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या 10 डावांमध्ये 43.44 च्या सरासरीने आणि 53.41 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 391 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालची दावेदारी मजबूत मानली जात आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारताचा 3-1 असा पराभव झाल्यानंतर संघाच्या प्रत्येक खेळाडूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अलीकडच्या काळात शुभमन गिलवरही टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये गिलने 5 डावात केवळ 93 धावा केल्या, त्यामुळे त्याच्या खेळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा -