Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
पिस्तूल आणि जिवंत बुलेट्स ठेवल्या जात. ते सतत तयारीत असत, जेणेकरून संधी मिळताच हत्या करू शकतील. त्यांना ही संधी 12 ऑक्टोबरच्या रात्री मिळाली.
Baba Siddique Case: NCP नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांड प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने 4590 पानांची चार्जशीट न्यायालयात दाखल केली असून, यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. 12 ऑक्टोबर 2024 च्या रात्री गुरमीत सिंग, धर्मराज कश्यप, आणि शिवकुमार गौतम यांनी बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्या. यानंतर राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, घटनास्थळी लोकांच्या मदतीने गुरमीत सिंग आणि धर्मराज कश्यप यांना पकडण्यात आले, तर शिवकुमार गौतम पळून जाण्यात यशस्वी ठरला. काही दिवसांनी शिवकुमारला उत्तर प्रदेशातील बहराइच येथे अटक करण्यात आली. तो नेपाळ पळून जाण्याच्या तयारीत होता. आता या घटनेत दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये या प्रकरणातले धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या हत्याकांडाच्या दोन महिन्यांपासून बंदराच्या परिसरात फिरून मारेकऱ्यांनी रेकी केली होती. ते बॅगमध्ये पिस्तूल आणि बुलेट्स ठेवत होते. मारेकऱ्यांनी 3-4 वेळा त्यांनी सिद्दीकी यांच्या घर व कार्यालयाची रेकी केली होती. यावेळी प्रत्येक आरोपी सॅक बॅगसोबत फिरत असे, ज्यामध्ये पिस्तूल आणि जिवंत बुलेट्स ठेवल्या जात. ते सतत तयारीत असत, जेणेकरून संधी मिळताच हत्या करू शकतील. त्यांना ही संधी 12 ऑक्टोबरच्या रात्री मिळाली. (Crime news Update)
12 ऑक्टोबर हा शेवटचा प्रयत्न होता
सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, जर 12 ऑक्टोबरला हत्या करण्यात अपयश आले असते, तर त्यांनी हा कट सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. दोन महिन्यांच्या रेकीनंतरही योग्य संधी मिळत नसल्याने ते निराश झाले होते. चार्जशीटमध्ये हेही उघड झाले आहे की, फायरिंगनंतर पोलिसांना सामोरे जावे लागू शकते हे लक्षात घेऊन आरोपींनी 12-13 हजार रुपये खर्च करून पेपर स्प्रे खरेदी केला होता. फायरिंगनंतर गुरमीत सिंगने स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांवर पेपर स्प्रेचा वापर केला. पोलिसांनी घटनास्थळी पेपर स्प्रेचा पुरावाही जमा केला आहे.
डोळ्यांवर पट्टी बांधून फायरिंगची प्रॅक्टिस
तपासादरम्यान मुंबई पोलिसांना समजले की 6 नोव्हेंबर रोजी पुण्यातील कर्वे नगरमधून अटक करण्यात आलेल्या गौरव आपुने, आरोपी रूपेश मोहोल आणि फरार आरोपी शुभम लोनकर यांनी झारखंडमध्ये जाऊन AK-47 ने फायरिंगची प्रॅक्टिस केली होती.आरोपींनी सांगितले की, ते तिघे 28 जुलै रोजी पुणे-हटिया एक्सप्रेसने पुण्याहून झारखंडला रवाना झाले होते. दुसऱ्या दिवशी हटिया स्टेशनवर उतरून 25-30 किलोमीटर प्रवास केल्यानंतर, त्यांचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना 2-2.5 तास प्रवास करून एका ठिकाणी नेण्यात आले. तिथे त्यांना फायरिंगची प्रॅक्टिस करून पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून परत आणण्यात आले.
नक्षल भागातील कनेक्शनची चौकशी सुरू
प्रॅक्टिस करण्यात आलेले ठिकाण नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याचे मानले जात असून, लॉरेंस बिश्नोई गँग आणि नक्षलवाद्यांमधील कनेक्शनची चौकशी सुरू आहे. आरोपींनी सांगितले की, फायरिंग प्रॅक्टिससाठी कोण व्यवस्था करत होते, हे त्यांना माहित नाही. ही सगळी व्यवस्था शुभम लोनकरने केली होती, जो सध्या फरार आहे.
हेही वाचा: