Yuzvendra Chahal Cryptic Post : धनश्रीसोबत काडीमोडाची चर्चा रंगली असतानाच युजवेंद्र चहलने टाकलं स्टेटस, सॉक्रेटिसचं 'ते' वाक्य ठरतंय चर्चेचा विषय
Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Divorce Rumours : युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर एक पोस्ट करून खळबळ उडून दिली आहे.
Yuzvendra Chahal Instagram Story Divorce Rumors Dhanashree Verma : टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. धनश्री आणि चहल लवकरच वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे. धनश्री आणि चहल यांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले आहे. धनश्रीसोबत घटस्फोटाच्या अफवांदरम्यान युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
धनश्रीसोबत घटस्फोटाच्या अफवांनंतर चहलने आज इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, जी घटस्फोटाच्या अफवांशी जोडली जात आहे. चहलने इन्स्टाग्रामवर एक कोट शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे, गोंगाटाच्या पलीकडे ऐकू शकणाऱ्या सर्वांसाठी शांतता हा सर्वात खोल आवाज आहे. चहलने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
मात्र, आतापर्यंत धनश्री आणि चहलने घटस्फोटाच्या मुद्द्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दोघांनी इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले असून चहलने धनश्रीसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. मात्र, धनश्रीने अद्याप हे केलेले नाही. विवाह 22 डिसेंबर 2020 रोजी धनश्री आणि चहल यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत. 2024 मध्ये धनश्रीने तिच्या आडनावावरून 'चहल' काढून टाकल्यानंतर घटस्फोटाच्या बातम्यांना जास्त हवा मिळाली.
2016 मध्ये भारतासाठी पदार्पण
युझवेंद्र चहलने 2016 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. यानंतर त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने टीम इंडियामध्ये स्वत:चे एक खास स्थान निर्माण केले. तो टीम इंडियासाठी टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी 80 टी-20I सामन्यांत 96 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 121 विकेट आहेत.
आयपीएलमध्ये 200 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज
आयपीएलमध्ये युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. यावेळी पंजाब किंग्ज संघाने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मोठी रक्कम मोजून त्याचा संघात समावेश केला आहे. पंजाब संघाने त्याच्यासाठी 18 कोटी रुपये मोजले आहेत. त्याने आयपीएलमध्ये 205 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 200 हून अधिक बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
हे ही वाचा -