Pramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?
Pramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलीन करण्यासाठी
'टूलकिट'चा वापर केला जात असल्याचा प्रकार
सायबर पोलिसांच्या तपासात समोर आलाय…
प्रमोद सावंतांच्याविरोधात बदनामीची ही मोहीम
नियोजनपूर्वक राबवली जातेय
आणि ही मोहिम राबवणाऱ्यांना विरोधकांसोबतच
मुख्यमंत्रीपदावर लक्ष असलेल्या भाजपमधील असंतुष्टांचंही सहकार्य लाभल्याचं कळतंय…
आणि म्हणूनच शासकीय नोकऱ्यांसाठी लाच घेण्यासारख्या प्रकरणात
सावंत यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे…
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरण्यात आलेलं टुलकिट ‘एबीपी माझा’च्या हाती लागलंय. प्रमोद सावंत आणि त्यांच्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी ‘शासकीय नोकऱ्यांसाठी लाच’ घेण्याच्या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न समाज माध्यमातून होत असल्याचे प्रकार सायबर पोलिसांनी उघड केलाय. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि टूलकिटचा वापर कसा केला जातोय? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट