ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूलकिटचा पर्दाफाश, बदनामीसाठी कसं करतात टूलकिट प्लॅनिंग, एबीपी माझाचा एक्स्लुझिव वृत्तांत
डोक्याला खाज सुटल्यावर तीन दिवसात पूर्ण टक्कल.. बुलढाण्यात पूर्णा नदीकाठी अजब आजाराने गावकरी हैराण, आरोग्य पथकाचा गावात ठिय्या, सर्वेक्षणाला सुरुवात
बुलढाण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, ५२ वर्षीय वसतिगृह अधीक्षकाचा बारा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, शासकीय वसतिगृहांची सुरक्षा ऐरणीवर
पुण्यात महिलेची कंपनीतील सहकाऱ्याकडून कोयत्याने हत्या, येरवड्याच्या नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमधील घटना, आरोपीला तात्काळ अटक
जादा परताव्याचे आमिष दाखवून टोरेस कंपनीचा लाखो मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा, शिवाजी पार्क पोलिसांकडून ३ जण अटकेत, रोकड आणि दागिने घेऊन पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांची कारवाई