Maharashtra Live Updates:मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण, दिल्लीतून अखेर शासन आदेश निघाला , वाचा राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स एकाच क्लिकवर
Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
LIVE
Background
Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
AI चा वापर करत उसाची लागवड? बारामतीत प्रयोग यशस्वी
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करताना उसाची लागवड बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे केलीय. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांनी घेतली. हा यशस्वी प्रयोग एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे केवीकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलेश नलवडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण त्यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले. संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेने चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण करणार असल्याचे देखील सांगितले. भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामती मध्ये केला आहे
भाजपकडून विरोधकांना धक्कातंत्र देण्याचे काम सुरुच
काल ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार
खासदार अशोक चव्हाण यांच्या मध्यस्थीने काँग्रेस पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा आक्रमक पवित्रा
एकामागोमाग एक पक्षप्रवेशाचा सिलसिला
मोठी बातमी! टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
झटपट श्रीमंतीच्य नादात ३ लाख मुंबई करांना टोरेस कंपनीने गंडा घातला आहे
या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी ३ जणांना अटक केली होती.
या गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता हा गुन्हा पुढील तपासासाठी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे
या प्रकरणात शिवाजी पार्क पोलिसांनी १०० हून अधिक तक्रारदारांचे जबाब नोंदवले आहेत
कोट्यावधी रुपयांच्या या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी
तानिया कसातोवा, सर्वेश अशोक सुर्वे आणि वैलेंटिना कुमार या तिघांना अटक केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ‘संघ दक्ष’
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची गोपनीय बैठक
खात्रीलायक सूत्रांची माहिती
राज ठाकरेंच्या भेटीनंतर शेलारांची संघाच्या नेत्यांसोबत चर्चा
मुंबईत मनसे आणि भाजप युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी संघही मैदानात
मोठी बातमी! मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा स्वप्न पूर्ण
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून दिल्लीतून अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना हा आदेश सोपवला असून हवा हवा असलेला शासन आदेश निघाल्याने राज्यभर या आदेशाचे स्वागत केलं जातंय . त्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आलाय.