एक्स्प्लोर

IND vs NZ, 3rd ODI, Toss Update : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना काही वेळात सुरु होत असून आज नाणेफेक न्यूझीलंडने जिंकत गोलंदाजी निवडली आहे.

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ ODI Series) तगडा विजय मिळवत मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ज्यानंतर भारत आजचा सामना जिंकून न्यूझीलंडला व्हाईट वॉश देऊ शकतो. तर न्यूझीलंड अखेरचा सामना जिंकून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यात मागील काही सामने भारत प्रथम फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारताना दिसला. आजही भारत अशीच कामगिरी करणार की ज्याप्रमाणे दुसऱ्या वन-डेमध्ये न्यूझीलंड (India vs New Zealand) स्वस्तात सर्वबाद झाला तशीच वेळ भारतावर येणार हे पाहावे लागेल. दरम्यान भारताने दोन बदल केले असून सिराज आणि शमी यांना विश्रांती देत चहल आणि उमरानला संधी दिली आहे. न्यूझीलंडनेही जॅकॉब डफीला हेन्री शिपलेच्या जागी संधी दिली आहे.

कसे आहेत दोन्ही संघ?

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल

न्यूझीलंड - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, जॅकॉब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

प्रथम गोलंदाजी करणाऱ्यांचा रेकॉर्ड चांगला

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमची (Holkar Cricket Stadium, Indore) खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय येथील चौकारही लहान असल्याने फलंदाजांना खूप मदत मिळते. वेगवान गोलंदाजांना देखील काही प्रमाणात मदत मिळते. मात्र धावा वाचवण्यासाठी गोलंदाजांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. आतापर्यंत खेळलेल्या एकूण पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 वेळा विजय मिळवला आहे, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करणे फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जनता दरबार घ्यावा, ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य 
ठाणे आपल्या सगळ्यांचं, ठाण्याच्या अडीअडचणी दूर करण्याकरता अधिकाऱ्यांना बोलवू: गणेश नाईक
Shatrughan Sinha On Non-Veg Ban:
"देशात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे..."; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 06 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सEknath Khadse : युद्ध सामग्री गोळा करण्यास सुरुवात करा,एकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांना सल्ला ABP MAJHAABP Majha Marathi News Headlines 7.00 AM TOP Headlines 7.00AM 05 February 2025Zero Hour Full : देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा ते कोल्हापूर, धूळ्यातील नागरी समस्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir Bank :  फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
फक्त एक बातमी अन् शेअर्स गडगडले! जम्मू-काश्मीर बँकेला 16,000 कोटी रुपयांची GST नोटीस
महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथं पाहिजे तिथं जनता दरबार घ्यावा, ठाण्याचे संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती होताच गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य 
ठाणे आपल्या सगळ्यांचं, ठाण्याच्या अडीअडचणी दूर करण्याकरता अधिकाऱ्यांना बोलवू: गणेश नाईक
Shatrughan Sinha On Non-Veg Ban:
"देशात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे..."; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य
Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
Embed widget