एक्स्प्लोर

Zero Hour Full : देवेंद्र फडणवीसांचा बीड दौरा ते कोल्हापूर, धूळ्यातील नागरी समस्या

नमस्कार मी विजय साळवी... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. 

मंडळी... 

९ डिसेंबर २०२४... ही तारीख बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाची ठरलीय.. 

कारण, त्या दिवशी दोन घटना घडल्या.. 

पहिली.. मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुखांची निर्घृण हत्या..

आणि दुसरी घटना..

म्हणजे... त्या हत्येनंतर सुरु झालेलं बीडच्या बदनामीचं सत्र..

कोणी म्हणालं बीडचा बिहार होतोय... कोणी म्हणालं बीडमध्ये जन्माला आलोय हे आमचं दुर्दैवं... कोणी म्हणालं बीडचे आहोत हे सांगतानाही लाज वाटते.. तर कोणी म्हणालं बीडमध्ये काही राजकीय नेत्यांनी गुंडांना पोसलंय... कोणी म्हणालं बीडच्या गुंडगिरीमुळे मोठी स्थलांतरं झाली.. 

मंडळी... ही यादी सांगत बसलो तर पुढचा एक तासही पुरणार नाहीय.. म्हणून अगदी थोडक्यातच सांगितली.. आणि अशीच वक्तव्य.. असेच आरोप... असेच दावे.. आपण गेल्या दोन महिन्यांपासून ऐकतोय.. त्यामुळं बीडसारख्या गौरवशाली इतिहास असलेल्या जिल्ह्याचं नाव बदनाम होत होतं.. याचीही खंत अनेकांनी उघडपणे बोलून दाखवली...

आणि मंडळी.. त्याच बीडमध्ये आज जे घडलंय.. त्यानं मात्र... जिल्ह्याची नव्यानं ओळख होणार... यात काहीही शंका नाही...

निमित्त होतं... भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातल्या कुंटेफळ साठवण तलावाच्या भूमिपूजन सोहळ्याचं.. ज्याचा आष्टी परिसरातील ३० गावांच्या २५ हजार ५४३ हेक्टर जमिला थेट फायदा होणारय.. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांसाठीचा पाणी प्रश्न कायमचा सुटणारय..  आणि त्याच तलावाच्या भूमिपूजनासाठी त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये दाखल झाले होते..

खरं तर, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच बीड जिल्ह्याचा दौरा.... त्यामुळं त्यांच्या दौऱ्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं.. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आक्रमक भूमिका घेत... अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले होते.. तेच सुरेश धस... आजच्या भूमिपूजन सोहळ्याचे यजमान होते... आष्टीचे आमदार या नात्यानं. त्यामुळं त्यांच्या भाषणांकडे साऱ्यांचं लक्ष होतं...

ते आपण पाहणार आहोतच.. पण, मी आमच्या ऑनलाईन व्हिडीओ स्विचरना विनंती करतो.. की आजच्या सोहळ्याच्या भूमिपूजनाचा व्हिडीओ त्यांनी फुल फ्रेम दाखवावा..

मंडळी.. हा व्हिडीओ नीट पाहा... साठवण तलावाच्या भूमिपूजनाचा सोहळा सुरु आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यभागी उभे दिसतायत.. त्यांच्या उजव्या बाजूला मंत्री पंकजा मुंडे तर डाव्या बाजूला आमदार सुरेश धस दिसयायत. मंत्रोच्चार सुरु आहेत.. सुरेश धस यांच्या पाठीमागे... आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या एकदम बाजूला पाहिलं.. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिसतायत.. पण, तिथं होणारी थोडीशी अडचण लक्षात येताच... अवघ्या  वीस सेकंदामध्येच सुरेश धस आपली जागा बदलतात आणि पंकजा मुंडे यांच्या बाजूला जाऊन उभे राहतात.. 

त्या बाजूला गेल्यानंतर धस यांच्या लक्षात येतं... की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे हे.. पुजाऱ्यांच्या मागे उभे आहेत.. त्यांच्या बाजूला पवारांचेच आमदार संदीप क्षीरसागरही आहेत.. आणि ते दोघेही एकाच फ्रेममध्ये दिसत नाहीएत.. मग, काय धस यांनी भूमिपूजन सोहळा सुरु असतानाच बजरंग सोनावणेंना दुसऱ्या बाजूला येण्याची विनंती केली.. सुरुवातीला सोनावणेंनी आहे त्याच ठिकाणावर थांबणं पसंत केलं.. पण, धस यांनी वारंवार आवाज दिल्यानंतर खासदार सोनावणे दुसऱ्या बाजूला जातात.. त्यामुळे झालं काय.. तर पवारांचे एक खासदार आणि एक आमदार.. भाजपचे एक आमदार आणि दोन मंत्री... हे सगळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या बाजूला.. एकाच फ्रेममध्ये दिसले.. 

मंडळी.. ५० सेकंदांमध्ये जी फ्रेम आष्टीतील भूमिपूजनाच्य़ा सोहळ्यात दिसली... त्याचे अनेक राजकीय अर्थ आज राजकीय पंडितांनी लावलेत.. कारण, पुन्हा संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरु झालेल्या राजकारणाशी आहे..

याच फ्रेममधल्या बीड जिल्ह्यातील तीन प्रमुख चेहऱ्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंभोवती आरोपांचा डोंगर उभा केलाय.. धस विरुद्ध मुंडे... असा तर उघड संघर्षही झालाय. त्यामुळं आजचा सोहळा साठवण तलावाच्या भूमिपूजनाचा असला तरी धस अण्णांनी मूळ विषय सोडला नाही.. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा थेट उल्लेख त्यांनी केला नाही पण त्यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर थेट बोट ठेवलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली असं प्रशस्तीपत्रकसुद्धा धसांनी तिथेच देऊन टाकलं... सुरुवात करुयात त्याच वक्तव्यानं...

All Shows

झीरो अवर

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget