India A Faces Ball Tampering Allegations : इशान किशन वादाच्या भोवऱ्यात, टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप, ICC देणार शिक्षा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
India A vs Australia A Test News : रोहित शर्मा अँड कंपनीच्या आधी भारताचा अ संघ ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळत आहे. मकाऊ येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली आहे.
India A faces ball tampering allegations : रोहित शर्मा अँड कंपनीच्या आधी भारताचा अ संघ ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळत आहे. मकाऊ येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. भारताच्या अ संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप होत आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी मैदानावर प्रचंड गोंधळ झाला. अंपायरने चेंडू बदलण्याचा आदेश दिल्याने भारतीय संघ नाराज दिसत होता. इशान किशन आणि पंच यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू झाला.
मॅकॉय येथे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वीच हा राडा झाला. अंपायर शॉन क्रेग यांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतल्याने टीम इंडिया खूपच निराश दिसली. दरम्यान, इशान किशन आणि पंच यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि त्यामुळे इशानला मोठी शिक्षा होऊ शकते.
भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात पंच शॉन क्रेग यांनी भारत अ संघावर मोठा आरोप केला. स्टंपच्या माईकवर तो टीम इंडियाच्या खेळाडूंना असे म्हणताना ऐकू आला की, तुम्ही चेंडूशी छेडछाड केली आहे, त्यावर ओरखडे आहेत आणि आम्हाला चेंडू बदलावा लागेल. याप्रकरणी पुढे काय कारवाई होणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इशान किशनला शिक्षा होणार का?
जेव्हा अंपायर शॉन क्रेग यांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भारत अ खेळाडू इशान किशनला राग आला आणि त्याने अंपायरशी वाद घातला. स्टंप माईकवर पंचांना आता या प्रकरणी कोणतीही चर्चा होणार नाही, असे सुनावले. यावर इशान किशनने उत्तर दिले की आपण या चेंडूने खेळणार आहोत का? हा संभाषण नव्हता, हा मूर्खपणाचा निर्णय आहे. यष्टिरक्षकाने हे सांगताच अंपायर संतापले आणि त्यांनी याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले, हे असह्य आहे.
आता या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेनुसार, टीम इंडियाच्या खेळाडूंनी जाणूनबुजून चेंडूशी छेडछाड केल्यास संबंधित खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते.
भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलिया अ संघाने भारताचा 7 विकेट राखून पराभव केला. भारत अ संघ पहिल्या डावात अवघ्या 107 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया अ संघाने 195 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत धावफलकावर 312 धावा केल्या पण ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.
हे ही वाचा -