Sanjay Raut On North Kolhapur : उत्तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सोडली नाही है दुदैव
Sanjay Raut On North Kolhapur : उत्तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सोडली नाही है दुदैव
बेकायदेशीर पोलिस महासंचालक, ज्यावर गुन्हे दाखल आहे, निलंबित आहे, विरोधकांचे फोन टॅप केले, जो अधिकारी तुरूंगात जाण्याच्या तयारीत होता..त्याच्यावरील गुन्हे रद्द करून त्याला नवीन जबाबदारी देण्यात आली
- राज्याचं पोलिस महासंचालक पद अत्यंत प्रतिष्ठेचं आहे...त्यापदावर कुणाला बसवावं याचं भान गृहमंत्र्यांना नसेल तर त्या गृहमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे
- आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत की त्यांनी उशिरा का होईना ही कारवाई केली
- आता प्रश्न एवढाच आहे की पंत गेले आणि राव चढले असं नको व्हायला
- आपण तटस्थ आहोत हे दाखवण्यासाठी निवडणूक आयोगाला कराव्याच लागतात...झारखंडमधे पोलिस महासंचालकांची 24 तासांत बदली झाली कारण तिथे विरोधक भाजप आहे
- आम्हाला अजून खात्री नाही निवडणुका स्वच्छ होतील..ज्याप्रमाणात विरोधकांच्या पैशाच्या गाड्या पकडल्या जातायत, लोकांना त्रास दिला जातोय त्यामुळे निवडणुका निःपक्षपातीपणानं होतायत का हे बघावे लागेल
- अमेरिकेसारख्या महासत्तेची निवडणूक ही बॅलटपेपरवर होते आणि आपल्याकडे निवडणुका इव्हीएम्सवर होतात.
- रूपेश म्हात्रेंनी अर्ज मागे घेण्यापुर्वी जी काही भाषणं, वक्तव्यं केली ती पक्षशिस्तीत बसणारी नाहीत..त्यामुळे म्हात्रेंची पक्षातून हकालपट्टी झाली
- आम्ही इतके दिवस हेच सांगत होतो की शिवसेना ही बाळासाहेबांची आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे..ती चिन्हं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देणारे गुजरातचे दोन व्यापारी आहेत
- आम्हाला त्यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही..बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाही.
- राज ठाकरे काय बोलतात त्यावर महाराष्ट्र चालत नाही...त्यांना महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे जो शिवसेनेचा शत्रू आहे
- दादर-माहिम-प्रभादेवी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार १५ ते २० हजार मतांनी विजयी होतील.
- कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेने ७ वेळा जिंकलो आहे...बैठकीत या जागेसाठी मी स्वतः आग्रही होतो.. मात्र काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही..मात्र मविआला तडा जाईल असं आम्ही काहीही करणार नाही.
- आम्ही आघाडी आणि युतीच्या राजकारणात कायम प्रामाणिकपणे काम करतो..आमचा धर्म आम्ही सोडत नाही.