Ashwin Test Record : अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी, भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाजाच्या जवळ
Ashwin Test Record : आर अश्विनने (R Ashwin) आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने कसोटीत 434 विकेट्स घेतल्या आहेत. या बाबतीत तो कपिल देव (Kapil Dev) यांच्या बरोबरीला पोहोचला आहे.
IND vs SL Test : रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) पहिल्या कसोटीत एक खास विक्रम नावावर केला. भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी अश्विनने पथुम निसांकाची विकेट घेत कसोटीत आपल्या 434 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यामुळे अश्विनने आता माजी दिगग्ज क्रिकेटपटू कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सध्या हे दोन्ही गोलंदाज कसोटीत प्रत्येकी 434 विकेट घेणारे भारताचे दुसरे यशस्वी गोलंदाज आहेत.
लेगस्पिनर अनिल कुंबळे हा भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. कुंबळेने 619 विकेट घेतल्या आहेत. पहिल्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. भारताने पहिला डाव 8 बाद 574 धावा करून घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात केवळ 174 धावाच करू शकला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला.
भारताचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कपिल देवबद्दल बोलायचे झाले तर त्याने 131 कसोटीत 434 विकेट्स घेतल्या. त्याने 23 वेळा 5 विकेट्स आणि दोन वेळा 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर आर अश्विनची ही 85वी कसोटी आहे. त्याने आतापर्यंत 434 विकेट घेतल्या आहेत. 30 वेळा 5 आणि 7 वेळा 10 विकेट घेतल्या आहेत. दुखापतीनंतर अश्विनने शानदार पुनरागमन केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन सध्या नवव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 बळींसह अव्वल स्थानावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IND vs PAK Women World Cup : भारतीय महिला संघाचं पाकिस्तानला 245 धावांचं आव्हान; पूजा, स्नेह, स्मृतीची अर्धशतकं
- Viral News : साप आणि विंचूचं डिटॉक्स सूप, प्यायला लोक उत्सुक, तुम्ही पाहिलं का?
- Viral : डायनासोरपेक्षा जुना आहे 'हा' प्राणी, इतका धोकादायक आहे की काही मिनिटांत मरतो माणूस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha