Viral : डायनासोरपेक्षा जुना आहे 'हा' प्राणी, इतका धोकादायक आहे की काही मिनिटांत मरतो माणूस
Jellyfish : काही जीव इतके धोकादायक असतात की चावल्यानंतर लगेचच मृत्यू होतो. यामध्ये साप हा सर्वात विषारी आहे. पण यापेक्षाही धोकादायक इतर अनेक जीव आहेत.
Jellyfish : पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. काही जीव दिसायला खूप सुंदर असतात. काही जीव इतके धोकादायक असतात की चावल्यानंतर मानवाचा लगेचच मृत्यू होतो. साप (Snake) सर्वात विषारी प्राणी आहे असे मानले जाते, पण यापेक्षाही धोकादायक इतर अनेक जीव आहेत.
आम्ही अशाच एका सागरी प्राण्याबद्दल सांगणार आहोत, जो दिसायला खूप विचित्र आणि तितकाच धोकादायक आहे. बॉक्स जेली फिश (Box Jallyfish) असे त्या धोकादायक प्राण्याचे नाव आहे. बॉक्स जेलीफिश सामान्यतः ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंडो-पॅसिफिक समुद्रात (Indo-Pacific Ocean) आढळतात. त्यांच्या शरीरावर डार्ट असतात, जे काही मिनिटांत माणसाला मारू शकतात. (Jellyfish is older than dinosaurs, so dangerous that humans will die in minutes after attack)
जेलीफिश डायनासोरपेक्षा (Dinosaurs) जुने असल्याचे म्हटले जाते. शास्त्रज्ञांना जेलीफिशचे 505 दशलक्ष वर्षे जुने जीवाश्म सापडले आहेत, जे दाखवते की जेलीफिश डायनासोरच्या काळापेक्षा जास्त काळ पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. जेलीफिशच्या प्रजातींना देखील अमर प्राणी म्हटले जाते, जे कधीही मरत नाहीत.
आणखी एक धोकादायक जेलीफिश प्रजातीचे नाव आहे 'टुरिटोप्सिस डोहर्नी' (Turritopsis dornii). ही जेलीफिश दोन तुकड्यांमध्ये विभागले गेली तरीही मरत नाहीत तर त्याचे दोन जेलीफिश बनतात. जेलीफिशच्या काही प्रजाती लोक खातात.
इतर बातम्या :
- जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा...
- Skin Care Tips : चेहऱ्यावर हळद लावल्याने 'या' समस्या होतील दूर
- आतापर्यंत तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत, पण गुलाबजाम पराठा तुम्हाला माहित आहे का? पाहा हा व्हिडीओ
- Health Tips : आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय? मग 'या' टिप्स खास तुमच्यासाठी...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha