Viral News : साप आणि विंचूचं डिटॉक्स सूप, प्यायला लोक उत्सुक, तुम्ही पाहिलं का?
Viral News : सध्या सोशल मीडियावर एक अतिशय भयानक सूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोकादायक विषारी साप आणि विंचू वापरण्यात आले आहेत. सध्या चीनमध्ये बनवल्या जाणाऱ्या या सूपचे चाहतेही झपाट्याने वाढत आहेत.
Viral News : चीन (China) त्याच्या विचित्र खाद्यपदार्थांसाठी ओळखला जातो. सध्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) चीनचे असे धोकादायक खाद्य पाहायला मिळत आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. चीनच्या या स्पेशल डिशमध्ये दोन विषारी प्राण्यांचा वापर करुन 'डिटॉक्स सूप' (Detox Soup)बनवलं आहे. या विचित्र सूपची मागणी चीनमध्ये सातत्याने वाढत आहे. यामध्ये विषारी साप, विंचू यांचा वापर केला जात आहे. चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात ही धोकादायक डिश विकली जात आहे, जी लोकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
हे एक प्रकारचे डिटॉक्स सूप (Detox Soup) आहे. तर, चिनी लोकांच्या मते, ते हे सूप शरीर डिटॉक्स करण्यासाठी सेवन करतात. हे सूप बनवण्यापूर्वी साप आणि विंचूचे विष काढले जाते आणि हे सूप बनवण्यासाठी विंचू आणि साप तीन तासशिजवले जातात. सध्या सोशल मीडियावर हे धोकादायक सूप सर्वांनाच आश्चर्यचकित करताना दिसत आहे.
खाद्यपदार्थ विक्रेते पारंपरिक खाद्यपदार्थासोबत सतत नवनवीन प्रयोग करताना दिसतात. यादरम्यान अनेकवेळा काही स्ट्रीट फूड विक्रेते चांगले अन्नपदार्थ शोधत असतात. दुसरीकडे, बहुतेक प्रकरणांमध्ये अनेक विचित्र अन्नपदार्थ तयार होतात. चीनमध्ये असे अनेक विचित्र खाद्यपदार्थ बनवले जातात आणि अनेक वेळा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral : डायनासोरपेक्षा जुना आहे 'हा' प्राणी, इतका धोकादायक आहे की काही मिनिटांत मरतो माणूस
- जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल तर हे नक्की वाचा...
- Skin Care Tips : चेहऱ्यावर हळद लावल्याने 'या' समस्या होतील दूर
- Health Tips : आहारात मिठाचं प्रमाण कमी करायचंय? मग 'या' टिप्स खास तुमच्यासाठी...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha