Ind vs NZ- 3rd T20 Preview: भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज, कुठे आणि कसा पाहता येणार? घ्या जाणून
Ind vs NZ- 3rd T20 Preview: या मालिकेतील अखेरचा सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर (Eden Garden Stadium) खेळला जाईल.
![Ind vs NZ- 3rd T20 Preview: भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज, कुठे आणि कसा पाहता येणार? घ्या जाणून Ind vs NZ, 3rd T20: India playing against New Zealand in 3rd T20, When and where to watch match, Live telecast, timing and other details Ind vs NZ- 3rd T20 Preview: भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज, कुठे आणि कसा पाहता येणार? घ्या जाणून](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/470ddccb5776a593b98e61cbd8a6617e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ind Vs NZ, 3rd T20, Match Preview: भारतीय संघानं घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत 2-0 असा विजय मिळवत मालिका खिशात घातली. या मालिकेतील अखेरचा सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर (Eden Garden Stadium) खेळला जाईल. भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करीत आहे. तर, टीम साऊथी या टी-20 मालिकेत न्यूझीलंडच्या संघाची कमान संभाळत आहे. एकीकडे भारतीय संघाचं अखेरच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत निर्वादित वर्चस्व राखण्याचं लक्ष असेल. तर, दुसरीकडे या मालिकेतील अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरेल. या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे, कधी आणि कसा पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी बजावली. भारतीय संघानं या मालिकेतील सलग दोन टी-20 सामने जिंकून मालिका जिंकलीय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना आज संध्याकाळी सात वाजता सुरु होईल. दरम्यान, क्रिकेट प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगू आणि स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड चॅनेलवर लाईव्ह सामना पाहता येणार आहे. याशिवाय, डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवरही या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहू शकतात.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर आणि रुतुराज गायकवाड.
न्यूझीलंड संघ: टिम साऊदी (कर्णधार), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल आणि अॅडम मिल्ने.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)