एक्स्प्लोर

Majha Katta: भीक मांग रहा है क्या, सेहवागचं अख्तरला सडेतोड उत्तर; विक्रम साठ्येंनी सांगितला भन्नाट किस्सा 

Majha Katta: भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना सेहवाग विरुद्ध शोएब अख्तर (Shoaib Malik) हा वेगळाच सामना पाहायला मिळायचा.

Majha Katta: भारताचा स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची (Virendra Sehwag) कारकिर्द अवस्मरणीय आहे. सेहवागच्या आक्रमक फलंदाजीसमोर भल्याभल्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. सेहवाग कोणत्याही गोलंदाजाचा निडरपणे सामना करायचा. सेहवाग मैदानात असताना केवळ बॅटनेच नव्हेतर शब्दांनीही विरुद्ध गोलंदाजाचा समाचार घ्यायचा. दरम्यान, भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्यात क्रिकेट चाहत्यांना सेहवाग विरुद्ध शोएब अख्तर (Shoaib Malik) हा वेगळाच सामना पाहायला मिळायचा. यातच स्टँडअप कॉमेडियन विक्रम साठ्ये यांनी नुकतीच एबीपीच्या 'माझा कट्टा'वर हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यात 2004 मध्ये घडलेला आणखी एक धमाल किस्सा सांगितलाय. 

क्रिकेट म्हणजे भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळं क्रिकेटवर कॉमेडी करणं कठीण असू शकलं असतं. पण, विक्रम साठ्ये यांनी कॉमेडी ही केवळ मनोरंजन म्हणून करायची असं ठरवलं होतं. दिग्गज खेळाडूंसमोर त्यांच्याच नकला करणं, त्यांच्या चालण्याची शैली, त्यांची बोलण्या-वागण्याची पद्धत या सर्व गोष्टी स्टॅंडअप कॉमेडीच्या माध्यमातून सादर करतात. कुणी खेळाडू यावर नाराज झालाय का, किंवा चिडलाय का असं विचारलं असता विक्रम यांनी म्हटलं की, अनेक खेळाडूंना विक्रमनं केलेली नक्कल इतकी आवडते की त्यांना ती पुन्हा पुन्हा करायला सांगतात. खिलाडू वृत्ती असलेले हे खेळाडू कॉमेडीसुद्धा तशीच मनोरंजन म्हणून पाहतात आणि छान एंजॉय करतात!

भारतीय संघाचा मुख्य प्रक्षिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2004 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. भारतानं तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे पार खेळण्यात आला. या सामन्यात सेहवागनं 309 धावां करून विक्रम रचला. भारतानं हा सामना एक डाव आणि 52 धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर सेहवागला मुलतानचा सुलतान म्हणून नवी ओळख म्हणाली. सेहवागनं या सामन्यात शोएब अख्तरच्या नाकी नऊ आणले होते.  स्टँडअप कॉमेडियन विक्रम साठ्ये यांनी या सामन्यामधील सेहवाग आणि शोएबमधील एक धमाल किस्सा शेअर केलाय. जो खूप मजेशीर आहे. 

विक्रम साठ्ये म्हणाले की, सेहवागची आक्रमक फलंदाजी पाहून शोएब अख्तर खूप अस्वस्थ झाला होता. त्यानंतर त्यानं सतत बाऊन्सर टाकले. त्यावेळी सेहवागनं शोएब अख्तरच्या सलग चार बाऊन्सर चेंडूला डक केलं. त्यावेळी शोएब अख्तर सेहवागच्या जवळ आला आणि किमान एक पूल शॉट दाखव असा म्हणाला. "तू गोलंदाजी करतोस की भीक मागतोस?" असं उत्तर सेहवागनं त्यावेळी शोएबला दिलं होतं. हा किस्सा खूप कमी लोकांना माहिती असून याच सामन्यात सेहवागनं 300 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Speech Nashik | विकसित भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घ्यायला आलोय, मोदींनी नाशिकची सभा गाजवलीRaj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Embed widget