Rohit Sharma Old Picture: रोहितचा 15 वर्षापूर्वीचा जुना फोटो तुफान व्हायरल, कसा दिसायचा हिटमॅन शर्मा? एकदा बघाच
Rohit Sharma Old Picture: हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा 15 वर्षापूर्वीचा लूक पाहून त्याचे चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
Rohit Sharma Old Picture: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND Vs NZ) यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-20 मालिकेच्या दोन सामन्यात भारतानं विजय मिळवत मालिका खिशात घातली. या मालिकेतील अखेरचा सामना उद्या (21 नोव्हेंबर) कोलकाताच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Garden) खेळला जाणार आहे. याचदरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं (Deepak Chahar) गुरुवारी रोहित शर्मासोबतचा (Rohit Sharma) तब्बल 15 वर्षापूर्वीचा एक फोटो शेअर केलाय. क्रिकेट चाहत्यांकडून या फोटोला मोठी पसंती दाखवली जात आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
दिपकनं रोहितसोबतचा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये असं लिहलंय की, तब्बल 15 वर्षापूर्वीचा हा फोटो आहे. त्यावेळी मला आणि रोहितलाही दाढी नाही, असंही त्यानं म्हटलंय. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रोहित शर्माचा 15 वर्षापूर्वीचा लूक पाहून त्याच्या चाहत्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. रोहित शर्माच नव्हेतर दिपक चहरच्या लूकवरही प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय.
रोहितचा फोटो-
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी-20 सामना-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी दुसरा टी-20 सामना जेएससीए स्डेडिअमवर खेळण्यात आला. भारतानं हा सामना 7 गडी राखून जिंकलाय. या विजयासह भारतानं तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. दरम्यान, भारताचं टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मानं 36 चेंडूत 55 धावा केल्या.
रोहित शर्मानं सलामीवीर केएल राहुलसोबत 49 चेंडूत 65 धावांची भागेदारी केली. तर, केन विल्यमसनच्या गैरहजेरीत न्यूझीलंडच्या संघाचं कर्णधारपदं संभळणाऱ्या टीम साऊथीनं दमदार कामगिरी केली. त्यानं चार षटकात 16 धावा देऊन 3 गडी बाद केले. न्यूझीलंडनं 20 षटकात 6 गडी गमावून 153 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि मार्टीन गप्टीलनं अनुक्रमे 34 आणि 31 सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षल पटेलनं चांगली कामगिरी बजावली. त्यानं 4 षटकात 25 धावा देऊन 2 गडी बाद केले. दोन्ही संघ रविवारी कोलाकाताच्या ईडन गार्डनमध्ये आमने- येणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्या दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-