MS Dhoni On IPL: आयपीएलचा शेवटचा सामना कधी खेळणार? महेंद्रसिंह धोनी म्हणाला...
चेन्नईच्या संघाचा गौरव करण्यासाठी आज तामिळनाडूतील एका स्टेडियममध्ये एका समारंभाचे आयोजन करण्यात आले.
MS Dhoni On IPL: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. महेंद्रसिंह धोनीचे जगभरात चाहते आहेत. जगातील एक महान आणि यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची ख्याती आहे. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचं नेतृत्व करतोय. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आतापर्यंत आयपीएलचे चार किताब जिंकल्या आहेत. मात्र, महेंद्रसिंह धोनी पुढच्या वर्षी शेवटची आयपीएल खेळणार, अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यातच तामिळनाडूच्या राजधानीत आज झालेल्या एका कार्यक्रमात धोनीनं त्याच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलंय.
आयपीएल 2021 किताब जिंकल्यावर चेन्नईच्या संघानं विजय साजरा केला नव्हता. यामुळं चेन्नईच्या संघाचा गौरव करण्यासाठी आज तामिळनाडूतील एका स्टेडियममध्ये एका समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यकम्रात तमिळनाडूचे मुख्यमंत्री ए के स्टॅलिन हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात महेंद्र सिंह धोनीनं आयपीएलचा शेवटचा सामना कधी खेळणार? या प्रश्नावर उत्तर दिलंय. " मी नेहमी क्रिकेटसाठी माझी योजना तयार केली. अखेरचा सामना रांची खेळलो. मी एकदिवसीय देशांतर्गत क्रिकेटचा शेवटचा सामना रांचीत खेळलो. मला आशा आहे की, माझा अखेरचा टी-20 सामना चेन्नई होईल. ती गोष्ट पुढच्या वर्षी होईल की पाच वर्षात होईल, हे मी सांगू शकत नाही, असं धोनीनं म्हटलंय.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं काही दिवसांपूर्वी आयपीएल 2022 मध्ये आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना चेपॉक स्डेडिअमवर खेळणार असल्याची घोषणा केली होती. "निरोपाचा शेवटचा सामना पाहण्याची संधी चाहत्यांना नक्की मिळेल. आयपीएल 2022 च्या हंगामात चेपॉक स्टेडीयमवर क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने मी माझा कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहे", असं धोनीनं एका ऑनलाईन कार्यक्रमात म्हटलं होतं. परंतु, धोनीनं आज केलेल्या वक्तव्यामुळं क्रिकेटविश्वात नव्या चर्चांना उधाण आलंय. धोनी पुढच्या वर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेणार की पुढील पाच वर्ष खेळणार? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-