Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी युवराज सिंग सरसावला; दिल्ली सरकारला 15 हजार एन-95 मास्कची मदत
संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झालं आहे. भारतातही कोरोना व्हायरस फोफावताना दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच देशातील उद्योजक आणि इतरांना मदतीसाठी आवाहनदेखील केलं आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनापुढे हतबल झालं आहे. भारतातही कोरोना व्हायरस फोफावताना दिसत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच देशातील उद्योजक आणि इतरांना मदतीसाठी आवाहनदेखील केलं आहे. अनेकांनी कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी मदत केली आहे. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशातच कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी युवराज सिंगने मोठं पाऊल उचललं आहे. युवराज सिंगने दिल्ली सरकारला 15 हजार एन-95 मास्क दिले आहे.
एन-95 मास्कचा वापर रुग्णालयाच कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि नर्सेस वापरतात. दिल्ली सरकारने यापूर्वी सुरक्षा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किटची कमतरता असल्याचे सांगितले आहे. दिल्ली सरकारने वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किटची मागणी देखील केंद्र सरकारकडे केली होती.
कठीण प्रसंगी युवराज सिंगने केलेल्या या मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आभार मानले. अरविंद केजरीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, 'युवराज तुमच्या या मदतीसाठी दिल्ली आभारी आहे'.
Yuvraj ji, Delhi is very grateful to you for this generous contribution. Your remarkable victory over cancer is an inspiration, especially in these times. Together, we shall overcome. https://t.co/5qNf3lWJz6
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 18, 2020
युवराज सिंगने दिल्ली सरकारला मदत केल्यानंतर ट्विट केले, 'कोरोना व्हायरसच्या या लढाईत हेल्थ केअर प्रोफेशनमध्ये काम करणारे खरे हिरो आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मदत करताना आनंद होत आहे'.
मुख्यमंत्र्यांकडून मदतीसाठी आवाहन
कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-19 (COVID- 19 ) या नव्या खात्याती निर्मिती करण्यात आली आहे. या खात्यात स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Switzerland | स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगेवर भारताचा तिरंगी नकाशा, भारताने केलेल्या मदतीसाठी आभार