एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झोपडपट्टीतील मुलांमध्ये बॉक्सिंगसाठी संघर्षाची ताकद : टायसन
मुंबईत आयोजित 'मिक्स मार्शल आर्ट लीग'चं बॉक्सर माईक टायसनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
मुंबई : जगविख्यात बॉक्सर माईक टायसन मुंबईत दाखल झाला. मुंबईत आयोजित 'मिक्स मार्शल आर्ट लीग'चं टायसनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मीसुद्धा वंचित कुटुंबात जन्माला आलो होतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांमध्येच संघर्षाची अधिक ताकद असते, अशा भावना यावेळी माईक टायसनने व्यक्त केल्या.
तू सलमानच्या पार्टीला जायला किती उत्सुक आहेस, असा प्रश्न माईकला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला 'मला कुठल्याही पार्टीला नाही, तर मुंबईतल्या झोपडपट्टीत जायला आवडेल. कारण मीसुद्धा अशाच कुटुंबात जन्माला आलो. मीसुद्धा 'स्लमडॉग' होतो. मला झोपडपट्टीतून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे मी अधिक संघर्ष केला.' असं मनमोकळं उत्तर टायसनने दिलं.
बॉक्सिंग हा खेळ गरीब आणि वंचित मुलांमध्येच रुजवण्याची गरज आहे, असं तुला वाटतं का? या प्रश्नाचं माईक टायसनने होकारार्थी उत्तर दिलं. 'तुम्ही जितके गरीब असाल, तितकं चांगलं. झोपडपट्टीतून उभे राहिलेले लढवय्ये यशस्वी झाले आहेत. बॉक्सिंगसारख्या खेळाचा स्लम्समध्ये प्रचार व्हायला हवा. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांमध्येच बॉक्सिंगसाठी आवश्यक संघर्षाची अधिक ताकद असते, असं मत टायसनने व्यक्त केलं.
आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी पराभवाचा सामना करावाच लागतो. मात्र तुम्ही लढा देत राहायला हवा. कधीच हार मानता कामा नये, असा सल्लाही टायसनने दिला.
29 सप्टेंबरपासून 'मिक्स मार्शल आर्ट लीग' वरळीतील 'एनएससीआय डोम'मध्ये सुरु होणार आहे. या लीगला अखिल भारतीय मिश्रित मार्शल आर्ट्स फाउंडेशन आणि विश्व किक बॉक्सिंग महासंघाची मान्यता मिळाली आहे. या लीगच्या पहिल्या सत्रात विविध देशांचे आठ संघ सहभागी होणार आहेत.
टायसन मुंबईत दाखल होताच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने घेतली आहे. शेरा स्वतः त्याच्या सुरक्षारक्षकांसह विमानतळावर टायसनला सुरक्षा पुरवण्यास उपस्थित होता. सलमान खानच्या परवानगीनेच आपण इथे आल्याचे शेराने या वेळी सांगितलं. तर यावेळी उपस्थित टायसनच्या चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
Advertisement