एक्स्प्लोर
'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!
कोर्टाने त्याला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली, पण त्याने 19 महिन्यांची शिक्षा आधीच भोगली आहे. त्यामुळे आता त्याला 13 वर्ष पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
!['ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ! Blade runner Oscar Pistorius’ prison sentence increased to 13 years, 5 months 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/24150045/Oscar-Pistorius.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
केप टाऊन : 'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या सुप्रीम कोर्टाने 13 वर्षे पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात उच्च न्यायालयाने पिस्टोरियाला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. त्याविरोधात करण्यात आलेलं अपील मान्य करुन सुप्रीम कोर्टाने पिस्टोरिसच्या शिक्षेत वाढ केली आहे.
शिक्षेची सुनावणी होत असताना ऑस्कर कोर्टात उपस्थित नव्हता. कोर्टाने त्याला 15 वर्षांची शिक्षा ठोठावली, पण त्याने 19 महिन्यांची शिक्षा आधीच भोगली आहे. त्यामुळे आता त्याला 13 वर्ष पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
या प्रकरणात पिस्टोरियसवर आधी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यात आला होता. पण सुप्रीम कोर्टाने 2016 साली पिस्टोरियसने त्याची गर्लफ्रेण्ड रिव्हा स्टीनकॅम्पची हत्या केल्याचं मान्य केलं.
ऑस्कर पिस्टोरियसने पॅरालिम्पिक सहा वेळा सुवर्णपदकाची कमाई केली होती. फेब्रुवारी 2013 मध्ये गर्लफ्रेण्ड रिव्हा स्टीनकॅम्पमध्ये हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
ऑस्करला सहा वर्षांची शिक्षा कमी आहे, असं सरकारी वकील सातत्याने बोलत होते. तसंच स्टीनकॅम्पच्या हत्या प्रकरणात पिस्टोरियस वारंवार दोन पद्धतीचे जबाब देत आहे. तर पिस्टोरियसने जाणीवपूर्वक स्टीनकॅम्पने गोळी मारली, असं शेजाऱ्यांनी सांगितलं. वकिलांनी पिस्टोरियसला जन्मठेपेची मागणी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)