Australia vs India, 2nd ODI: इकडं हुकमी एक्का कुलदीपला वगळलं अन् तिकडं अॅडम झम्पानं टीम इंडियाला नाचवलं; शशी थरुर भडकले, त्यांच्या इंग्लिश 'नजराण्या'त म्हणाले..
Australia vs India, 2nd ODI: टीम इंडियाला आज बार्टलेट आणि फिरकी गोलंदाज अॅडम झम्पाने तगडा झटका दिला. झम्पाने चार विकेट घेतल्या, तर बार्टलेटने तीन विकेट घेत टीम इंडियाला भगदाड पाडले.

Shashi Tharoor on Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडियाची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली. टीम इंडियाच्या अवघ्या 16 धावांवर शुभमन गिल आणि विराट कोहली तंबूत परतले. त्यानंतर रोहित आणि श्रेयसने केलेल्या शतकी भागीदारीने भारताला दोनशे पार मजल मारता आली.
झम्पाने चार विकेट घेतल्या, कुलदीपला संधी नाही
टीम इंडियाला आज बार्टलेट आणि फिरकी गोलंदाज अॅडम झम्पाने तगडा झटका दिला. झम्पाने चार विकेट घेतल्या, तर बार्टलेटने तीन विकेट घेत टीम इंडियाला भगदाड पाडले. यानंतर संघ निवडीवरून काँग्रेस नेते शशी थरुर यांनी टीम इंडियाच्या निवडीवरुन तोफ डागली आहे. कुलदीप यादवला वगळून हर्षित राणाला संधी दिल्याने शशी थरुर भडकल्याचे दिसून आले.
So Xavier Bartlett took just four balls to show the Indian selectors the idiocy of their decision to leave out the most potent match-winner in their squad, @imkuldeep18, in favour of a journeyman pacer like Rana. It was wrong to omit Kuldeep in England & it is absurd not to pick…
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 23, 2025
कुलदीप यादवला बाहेर ठेवून मोठी चूक केली
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट निवड समितीवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, फक्त चार चेंडूतच झेवियर बार्टलेटने दाखवून दिलं की भारतीय निवडकर्त्यांनी संघातून कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) बाहेर ठेवून मोठी चूक केली आहे. त्याच्याऐवजी रणासारख्या साधारण वेगवान गोलंदाजाला घेतलं, हा निर्णय चुकीचा आहे. इंग्लंड दौऱ्यात कुलदीपला वगळणं चुकलं होतंच, पण अॅडलेडमध्ये त्याला न घेणं तर अजूनच हास्यास्पद आहे. हा फारच वाईट निर्णय आहे.
कोहलीने अॅडलेडला निरोप दिला
दुसरीकडे, विराट कोहली सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शून्य धावांवर बाद झाला. तो पॅव्हेलियनमध्ये परतताच अॅडलेडमधील प्रेक्षकांनी उभे राहून त्याचे कौतुक केले. टाळ्यांच्या कडकडाटात कोहलीने आभार मानत हात वर करून प्रतिसाद दिला. असे मानले जाते की हा अॅडलेडमधील कोहलीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय डाव आहे. कोहलीने आधीच कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पुढील दोन वर्षांत भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार नाही. याचा अर्थ असा की कोहली 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळला तरी तो आता ऑस्ट्रेलियात खेळणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या


















