(Source: Poll of Polls)
Virat Kohli Video: किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही! सलग दुसऱ्या सामन्यात शुन्यावर गंडला
तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा टीम इंडियासाठी 'करो या मरो' (Do or Die for Team India) असा आहे. हा महत्त्वाचा मुकाबला आज (23 ऑक्टोबर) अॅडलेड (Adelaide Oval) मध्ये होत आहे.

Virat Kohli: टीम इंडियाचा किंग विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात (Australia vs India 2nd ODI) शून्यावर बाद झाल्याने, त्याच्या फॉर्मबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेतही त्याला आपले खाते उघडता आले नव्हते. पर्थ वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूवर बाद केले होते. भारतीय संघाला पहिल्या वनडे सामन्यात सात गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा टीम इंडियासाठी 'करो या मरो' (Do or Die for Team India) असा आहे.
VIRAT KOHLI GONE FOR HIS SECOND DUCK OF THE SERIES!#AUSvIND | #PlayoftheDay | @BKTtires pic.twitter.com/jqIdvMeX9T
— cricket.com.au (@cricketcomau) October 23, 2025
किंग कोहलीला 'फेव्हरेट ग्राउंड'वरही भोपळा फुटला नाही
या निर्णायक सामन्यात सर्वांच्या नजरा संघाचा माजी कर्णधार कोहलीवर होत्या, पण या सामन्यातही त्याला खाते खोलता आले नाही. कारण अॅडलेड ओव्हलमध्ये त्याची अतिशय जबरदस्त कामगिरी होती. अनेकदा हे मैदान कोहलीचे 'फेव्हरेट ग्राउंड' म्हणून ओळखले जाते. कोहलीने अॅडलेड ओव्हलमध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 65 च्या उत्कृष्ट सरासरीने (Average) एकूण 975 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतकांचा समावेश आहे. विशेषतः एकदिवसीय (ODI) सामन्यांचा विचार केल्यास, कोहलीने या मैदानावर 4 सामने खेळले असून, त्याच्या नावावर 61.00 च्या सरासरीने 244 धावा आणि 2 शतके नोंद आहेत.
अॅडलेड ओव्हलवर टीम इंडियाचा रेकॉर्ड शानदार
केवळ कोहलीच नाही, तर अॅडलेड ओव्हलवर टीम इंडियाचा (Team India) एकूण रेकॉर्ड देखील शानदार आहे. भारताने येथे खेळलेल्या 15 एकदिवसीय सामन्यांपैकी 9 सामने जिंकले आहेत, तर 5 मध्ये पराभव झाला आणि एक सामना बरोबरीत सुटला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय संघाने 17 फेब्रुवारी 2008 नंतर या मैदानावर एकही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामना गमावलेला नाही; म्हणजेच, 17 वर्षांपासून भारत अॅडलेड ओव्हलमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजेय आहे.
इतर महत्वाच्या बातम्या



















