एक्स्प्लोर
एशियाड : पात्रता फेरीतच पैलवान सुशील कुमारला पराभवाचा धक्का
पुरुषांच्या 74 किलो वजनी गटातल्या पात्रता फेरीच्या पहिल्याच लढतीत बहारिनच्या अॅडन बेतिरोव्हने सुशील कुमारला पराभवाचा धक्का दिला.

जकार्ता : दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशीलकुमारचं जकार्ता एशियाडमधलं आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आलं. पुरुषांच्या 74 किलो वजनी गटातल्या पात्रता फेरीच्या पहिल्याच लढतीत बहारिनच्या अॅडन बेतिरोव्हने सुशील कुमारला पराभवाचा धक्का दिला. सुशीलला या लढतीत बेतिरोव्हने 5-3 अशी मात दिली. सुरुवातीला 2-0 अशी आघाडी घेऊनही बेहरिनच्या पैलवानासमोर सुशीलचा निभाव लागला नाही. त्यामुळे एशियाडमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचं सुशील कुमारचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. 2006 च्या दोहा एशियाडमध्ये सुशीलने कांस्यपदकाची कमाई केली होती. एशियाडमध्ये पहिल्याच दिवशी भारताला पदक भारताचे नेमबाज अपूर्वी चंडेला आणि रवी कुमारने 18 व्या एशियाडमध्ये भारताला पहिल्या पदकाची कमाई करुन दिली. या जोडीने 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी प्रकारात कांस्यपदक पटकावलं. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांगमध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांनी पहिलं पदक भारताच्या झोळीत टाकलं. अपूर्वी आणि रवी कुमार या जोडीने 429.9 गुणांची नोंद करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. चायनीज तैपेईच्या लीन यींगशीन आणि लू शाओचुआन जोडीने सुवर्ण तर चीनच्या झाओ आणि यांगने रौप्यपदक पटकावलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग























