एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : अर्जुन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट
कोलंबोतील मैदानावर सुरु असलेल्या यूथ टेस्टमध्ये त्याने पहिला गडी बाद करत आपलं खातं उघडलं. अर्जुन तेंडुलकरची अंडर-19 भारतीय संघात निवड झाली आहे.
कोलंबो : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या अंडर-19 सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. कोलंबोतील मैदानावर सुरु असलेल्या यूथ टेस्टमध्ये त्याने पहिला गडी बाद करत आपलं खातं उघडलं.
अर्जुन तेंडुलकरची अंडर-19 भारतीय संघात निवड झाली आहे. श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज कामिल मिश्राला पायचीत करत त्याने पहिली विकेट मिळवली.
भारतीय संघाचा कर्णधार आणि विकेटकीपर अनुज रावतने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विकेट घेतली.
भारताचा अंडर-19 संघ श्रीलंका दौऱ्यावर दोन चार दिवसीय सामने आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. तर दुसरा कसोटी सामना 24 ते 27 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ :
Arjun Tendulkar ( son of @sachin_rt) traps the batsman LBW to pick his maiden wicket in Youth Internationals Video courtesy- Srilanka cricket pic.twitter.com/DBcapjhovA
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) July 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement