एक्स्प्लोर
RCB ला आणखी एक धक्का, राहुल IPL मधून आऊट

मुंबई: एकीकडे कर्णधार विराट कोहली दुखापतीने त्रस्त असताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आणखी एक धक्का बसला आहे. सलामीवीर-विकेटकीपर के एल राहुलही दुखापतीमुळे आयपीएलमधूनच बाहेर पडला आहे. के एल राहुललाही भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आता तो आयपीएलच्या एकाही सामन्यात खेळू शकणार नाही. राहुल आता उपचारासाठी लंडनला जाणार असून, तिथे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.
IPL 10: ..तर कोहली ऐवजी डिव्हिलियर्स RCB चा कर्णधार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच राहुलचा खांदा दुखावला होता. मात्र तरीही तो दुखरा खांदा घेऊन संपूर्ण कसोटी खेळला. बंगळुरुच्या दुसऱ्या कसोटीत तर राहुलने दोन अर्धशतकं झळकावली, मात्र दुखापतीमुळे मोठे फटके खेळता आले नाहीत, असं त्याने त्यावेळी सांगितलं होतं. ही कसोटी भारताने जिंकली होती.कोहलीचा 'विराट' करार, दिवसाची कमाई 5 कोटी!
राहुलने 7 खेळींमध्ये तब्बल 6 अर्धशतकं झळकावली. त्याने या कसोटी मालिकेत 393 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराशिवाय राहुलच या मालिकेत भारताचा प्रमुख आधारस्तंभ बनला होता. कोहलीही दुखापतग्रस्त आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम काहीशी अडचणीत आहे. कारण आरसीबीचा कर्णधार विराट कोहली अजूनही फिट नाही. त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. जर विराट पहिल्या काही सामन्यांत खेळू शकला नाही तर एबी डिव्हिलियर्स संघाचं नेतृत्त्व करेल, असं आरसीबीचे हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितलं. संबंधित बातम्याIPL 10: ..तर कोहली ऐवजी डिव्हिलियर्स RCB चा कर्णधार!
कोहलीचा 'विराट' करार, दिवसाची कमाई 5 कोटी!
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र






















