Netherlands vs Afghanistan : अफगाणिस्तानचा विजयी चौकार, वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी
लखनौ : वर्ल्डकपच्या इतिहासातील वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करत असलेला आफगाणिस्तानने आज नेदरलँडला सुद्धा पराभवाचा धक्का दिला.
लखनौ : वर्ल्डकपच्या इतिहासातील वर्ल्डकपच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी करत असलेला अफगाणिस्तानने आज नेदरलँडला सुद्धा पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे चौथ्या विजयाची नोंद करत वर्ल्डकपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. विश्वविजेती टीम वर्ल्डकपमध्ये चाचपडत असताना अफगाण टीमने केलेली कामगिरी निश्चितच त्यांच्या देशासाठी आनंद देणारी आहे.
This World Cup campaign will be written in golden letters in Afghanistan history. pic.twitter.com/Br0jC7VAMe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
नेदरलँडला 179 धावांत गुंडाळल्यानंतर तेच आव्हान जवळपास सहाच्या सरासरीने गाठत अफगाणिस्तान चौथ्या विजयाची नोंद केली. रहमत शहाने 52 धावांची खेळी केली. कर्णधार हशमतुल्लाहने साजेशी कामगिरी करत नाबाद 56 धावा केल्या, अझमतुल्लाह 31 धावांवर नाबाद राहिला.
AFGHANISTAN HAVE REPLACED PAKISTAN AT NO.5 IN POINTS TABLE...!!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
4th victory in this World Cup for Afghanistan, they're a super team. pic.twitter.com/tyVCz5Canf
नेदरलँड झुंजार अफगाणसमोर कोलमडला
नेदरलँडने टाॅस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकाली, पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसल्यानंतर नेदरलँडने 2 बाद 92 अशी मजल मारली होती, पण त्यांचा डाव तेथून कोलमडून 35 षटकात 8 बाद 152 असा कोलमडला. अफगाणच्या नियंत्रित माऱ्यासमोर नेदरलँडचे फलंदाज चाचपडताना दिसून आले.
Most wins by the Asian teams in World Cup 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
India - 7 wins from 7 games.
Afghanistan - 4 wins from 7 games.
Pakistan - 3 wins from 7 games.
Sri Lanka - 2 wins from 7 games.
Bangladesh - 1 win from 7 games. pic.twitter.com/GlMVaP59jG
मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरेसी, कॉलिन एकरमन यांनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. एंजेलब्रेक्टने अर्धशतक करत डाव सावरला. तब्बल चार फलंदाज रन आऊट झाल्याने नेदरलँडला झटका बसला. अखेर त्यांचा डाव 46.3 षटकात 179 धावांवर आटोपला. नबीने तीन विकेट घेतल्या, तर नूर अहमदने दोन विकेट घेतल्या. मुजीबला एक विकेट मिळाली.
AFGANISTAN MOVES TO 5th IN THE POINTS TABLE....!!!! 🇦🇫
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
- They have over taken Pakistan with 4 wins from 7 games. pic.twitter.com/QohENWK1Ty
अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आज नेदरलँडला पाणी पाजून विजयाचा चौकार मारला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या