Netherlands vs Afghanistan : बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला गार करणारा नेदरलँड झुंजार अफगाणसमोर कोलमडला
Netherlands vs Afghanistan : वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघाची कामगिरी दमदार झाली आहे. अफगाणिस्तानने 6 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. तर नेदरलँड्सने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत.
लखनौ : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धक्कादायक कामगिरी जगज्जेत्यांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडलेल्या नेदरलँड आणि झुंजार अफगाणिस्तान (Netherlands vs Afghanistan) यांच्यात आज सामना होत आहे. नेदरलँडने टाॅस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकाली, पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसल्यानंतर नेदरलँडने 2 बाद 92 अशी मजल मारली होती, पण त्यांचा डाव तेथून कोलमडून 35 षटकात 8 बाद 152 असा कोलमडला. अफगाणच्या नियंत्रित माऱ्यासमोर नेदरलँडचे फलंदाज चाचपडताना दिसून आले. मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरेसी, कॉलिन एकरमन यांनी चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. एंजेलब्रेक्टने अर्धशतक करत डाव सावरला. तब्बल चार फलंदाज रन आऊट झाल्याने नेदरलँडला झटका बसला. अखेर त्यांचा डाव 46.3 षटकात 179 धावांवर आटोपला. नबीने तीन विकेट घेतल्या, तर नूर अहमदने दोन विकेट घेतल्या. मुजीबला एक विकेट मिळाली.
NETHERLANDS 92 FOR 2 TO 97 FOR 5.......!!!!! pic.twitter.com/P65g1TuYKo
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
दुसरीकडे, वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघाची कामगिरी दमदार झाली आहे. अफगाणिस्तानने 6 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. तर नेदरलँड्सने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही संघांनी मोठ्या संघांना पराभूत केले आहे.
अफगाणिस्तानचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे 6 गुण आहेत. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. अफगाणिस्तान संघात खूप चांगले खेळाडू आहेत, जे त्यांना संकटाच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यास सक्षम आहेत. गुरबाज, इब्राहिम झद्रान आणि कर्णधार शाहिदी संघासाठी चांगली कामगिरी करू शकतात.
Rashid Khan fans in Lucknow. pic.twitter.com/RroLEKxgGI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
या सामन्यादरम्यान चाहत्यांच्या नजरा मुजीब आणि रहमत शाह यांच्यावरही असतील. मुजीब 100 बळी घेण्याच्या जवळ आहे. त्यांना फक्त एका विकेटची गरज आहे. रहमत 4000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. त्यासाठी त्याला 95 धावांची गरज आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला की, 'आम्ही प्रथम फलंदाजी करू. हे आतापर्यंत आमच्यासाठी चांगले सिद्ध झाले आहे. विकेट छान दिसते. आशा आहे की, आम्ही यावर चांगल्या धावा करू आणि नंतर बचाव देखील करू.
अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला म्हणाला की, 'आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. पण आता काहीही फरक पडत नाही. आम्हाला 100 षटकांचे चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आज येथे चेंडू चांगली फिरेल. त्यामुळे आम्ही चार फिरकीपटूंसोबत जात आहोत. आमच्या संघात एक बदल झाला आहे. नवीन-उल-हकच्या जागी नूर अहमद खेळत आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग-11
- अफगाणिस्तानः रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी.
- नेदरलँड्स: मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरेसी, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, साकिब झुल्फिकार, व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.