![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ben Stokes on Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या फायरिंग बाॅलने दांडी गुल; गांगरून गेलेल्या बेन स्टोक्सची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया!
टीम इंडियाच्या विजयी सप्तमीत पुन्हा एकदा मोहम्मद शमी चमकला. श्रीलंकेविरुद्धही त्याने 14 धावात पाच गडी बाद करत विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्धही शमीने घातक गोलंदाजी केली होती.
![Ben Stokes on Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या फायरिंग बाॅलने दांडी गुल; गांगरून गेलेल्या बेन स्टोक्सची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया! ICC Cricket World Cup 2023 Mohammed Shami is the best bowler of this World Cup. He's a phenomenal bowler Ben Stokes on Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या फायरिंग बाॅलने दांडी गुल; गांगरून गेलेल्या बेन स्टोक्सची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/331461fd9bb48ce1b35c3e1ad8fc849f1699011556258736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ben Stokes on Mohammed Shami : वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघ पार हबकून गेले आहेत. टीम इंडियाच्या विजयी सप्तमीत पुन्हा एकदा मोहम्मद शमी चमकला. श्रीलंकेविरुद्धही त्याने 14 धावात पाच गडी बाद करत विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, इंग्लंडविरुद्धही शमीने घातक गोलंदाजी केली होती. यामध्ये सर्वाधिक काळ इंग्रजांना वेदना देईल, अशी बेन स्टोक्सची (England Test captain Ben Stokes) दांडी शमीनेच गुल केली होती. तब्बल 16 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर स्टोक्सची दांडी गुल केली होती.
‘टूर्नामेंट ऑफ बॉलर’
आज इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने नरेंद्र मोदी स्टेडियमवर पत्रकारांशी संवाद साधताना, शमीवर कौतुकाचा वर्षाव केला. ‘टूर्नामेंट ऑफ बॉलर’ असल्याची प्रतिक्रिया बेन स्टोक्सने दिली.
Ben Stokes said, "Mohammed Shami is the best bowler of this World Cup. He's a phenomenal bowler". pic.twitter.com/WaPaBeiDNh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2023
अनेक स्पेलपैकी एक स्पेल आमच्याविरुद्ध
स्टोक्स म्हणाला की, मी शमीविरुद्ध बरेच क्रिकेट खेळलो आहे. तो एक अप्रतिम गोलंदाज आहे आणि मला वाटते की काल रात्री आम्ही (श्रीलंकेविरुद्ध) त्याला पाहिले आणि त्यांनी विश्वचषकात एक अभूतपूर्व स्थिती आणली. मला वाटतं, तो साहजिकच विश्वचषकाचा गोलंदाज आहे. मला वाटत नाही की त्याने प्रत्येक सामना खेळला आहे पण तो ज्या पद्धतीने खेळला आहे, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक सामन्यात त्याने किती विकेट्स घेतल्या आहेत हे अविश्वसनीय आहे. अर्थातच त्याने या विश्वचषकात केलेल्या अनेक स्पेलपैकी एक स्पेल आमच्याविरुद्ध होता.
Serious Fast Bowling by @MdShami11 to #Benstokes. It's a stress buster. Do watch 👇 pic.twitter.com/uOHq0VbTe8
— Pramod Kumar Singh (@SinghPramod2784) October 30, 2023
दरम्यान, 32 वर्षीय स्टोक्सने त्रासदायक गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. दुखापतीमुळे स्टोक्सला विश्वचषकात अजिबात गोलंदाजी करता आलेली नाही, परंतु 25 जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरू होणाऱ्या भारताच्या पाच कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी तो वेळेत परतण्याची अपेक्षा आहे.
2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पात्रता संधी धोक्यात येऊ शकते
दरम्यान, निराश दिसत असलेल्या स्टोक्सने इंग्लंडच्या आतापर्यंतच्या वाईट विश्वचषक मोहिमेत काहीच हाती लागलं नसल्याचं कबूल केलं. गतविजेत्या इंग्लंडने 10-संघांच्या टेबलमध्ये सर्वात तळाशी असून सहापैकी पाच सामने गमावले आहेत आणि शनिवारी अहमदाबादमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या पराभवामुळे त्यांची 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पात्रता संधी धोक्यात येऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)