या दौऱ्यात रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या कलेचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी लतादीदींचे शिल्प साकारुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
2/7
3/7
4/7
कोकणातील मालवण, रत्नागिरीनंतर आता गणपतीपुळेच्या समुद्र किनारी पटनाईक आपले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पुढील वाळूशिल्प साकारणार आहेत.
5/7
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ओरीसातील वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
6/7
महाराष्ट्राच्या 23 समुद्र किनाऱ्यांवर सध्या निर्मल सागर तट अभियान राबवलं जातं आहे. या अभियानात पटनाईक वाळूशिल्पाच्या माध्यमातून किनारा स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहेत.
7/7
याशिवाय त्यांनी आणखीन एक शिल्प साकारुन समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचा संदेश दिला. त्यांची शिल्पे बघण्यासाठी सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर लोक गर्दी करताहेत.