एक्स्प्लोर
Rinku Singh : कोलकाताचा हिरो IPL 2024 मध्ये फेल, रिंकू सिंगचं स्वप्न भंगलं, टी20 वर्ल्डकपची संधी हुकली कारण...
Rinku Singh : यंदाच्या आयपीएलमध्ये रिंकू सिंगची कामगिरी अपेक्षेप्रमाणं झालेली नाही. गेल्या वर्षी आयपीएल गाजवणारा रिंकू यावेळी चांगली कामगिरी करु शकलेला नाही.

रिंकू सिंग
1/6

टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्ड कप टीमची घोषणा 30 एप्रिल रोजी करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील 15 सदस्यीय संघात रिंकूला संधी मिळाली नव्हती. त्याचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आला आहे.
2/6

यंदाच्या आयपीएलमध्ये रिंकू सिंगची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. त्याला 10 मॅचमध्ये केवळ 125 धावा करता आल्या आहेत.
3/6

रिंकू सिंगनं कोलकाताकडून खेळताना गेल्यावर्षीचं आयपीएल गाजवलं होतं. रिंकू सिंगनं आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये आयरलँड विरुद्ध पदार्पण केलं होतं. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो भारतीय संघाचा सदस्य होता.
4/6

आयपीएल 2024 मध्ये रिंकू सिंगची सर्वोच्च धावसंख्या 26 धावा इतकी आहे. चार मॅचमध्ये त्याला दोन अंकी धावसंख्या देखील गाठता आलेली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये रिंकू सिंग अपयशी ठरलाय.
5/6

रिंकू सिंगनं भारताकडून 15 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 176.24 च्या स्ट्राइक रेटनं 89 च्या सरासरीनं 873 धावा केल्या आहेत.
6/6

रिंकू सिंगनं आयपीएलमध्ये 42 मॅचेस खेळल्या असून त्याचं स्ट्राइक रेट 142.88 असून सरासरी 31.18 इतकी आहे. त्यानं 356 धावा केलेल्या आहेत. आयपीएलचा 2024 हंगाम त्याच्यासाठी निराशाजनक राहिलाय. या कारणामुळं त्याची टी-20 वर्ल्डकपची संधी हुकलीय. कोलकाता नाईट रायडर्सची सलामीची जोडी चांगल्या धावा करत असल्यानं रिंकूला बॅटिंग करण्यासाठी कमी वेळ मिळालाय.
Published at : 08 May 2024 12:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
