एक्स्प्लोर
IPL 2023: गुजरातची गाडी सुसाट.... चेन्नईनंतर दिल्लीचा केला पराभव
हार्दिक पांड्याच्या गुजरातने सलग दुसरा विजय मिळवला...
![हार्दिक पांड्याच्या गुजरातने सलग दुसरा विजय मिळवला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/6c31f4f0503989ebd107cde70d2bd9c01680631141566689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2023
1/8
![DC vs GT, Match Highlights : मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीनंतर साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरवर गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. दिल्लीने दिलेले 164 धावांचे आव्हान दिल्लीने सहा विकेट आणि 11 चेंडू राखून पार केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/f2bb99a514a2bf3c48ce178d3ea56319f7771.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
DC vs GT, Match Highlights : मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीनंतर साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरवर गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. दिल्लीने दिलेले 164 धावांचे आव्हान दिल्लीने सहा विकेट आणि 11 चेंडू राखून पार केले.
2/8
![गुजरातचा हा सलग दुसरा विजय होय... गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. तर आज दिल्लीला आस्मान दाखवले. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/40b27f605bbe4b6ea1cf65238897552bd2221.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुजरातचा हा सलग दुसरा विजय होय... गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता. तर आज दिल्लीला आस्मान दाखवले. दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होय. दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे.
3/8
![दिल्लीने दिलेले १६४ धावांचे आव्हान पार करताना गुजरातच्या सुरुवातीच्या विकेट झटपट पडल्या. वृद्धीमान साहा, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या झटपट बाद झाले. गिल आणि साहा यांनी प्रत्येकी 14 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या पाच धावा काढून बाद झाला. दुसऱ्या क्रमांकार आलेल्या साई सुदर्शन याने संयमी फलंदाजी केली. आधी विजय शंकरसोबत डावाला आकार दिला. त्यानंतर डेविड मिलरच्या साथीने गुजरातला विजय मिळवून दिला. विजय संखर याने 29 धावांची खेळी केली. डेविड मिलर याने नाबाद 31 धावांची खेळी केली. साई सुदर्शन याने नाबाद 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान साई सदर्शन याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. या सामन्यात साई सुदर्शन याचे एकमेव अर्धशतक होय..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/80e03b0c8de5e1751ecb22fe37ca7f4d98002.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीने दिलेले १६४ धावांचे आव्हान पार करताना गुजरातच्या सुरुवातीच्या विकेट झटपट पडल्या. वृद्धीमान साहा, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या झटपट बाद झाले. गिल आणि साहा यांनी प्रत्येकी 14 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या पाच धावा काढून बाद झाला. दुसऱ्या क्रमांकार आलेल्या साई सुदर्शन याने संयमी फलंदाजी केली. आधी विजय शंकरसोबत डावाला आकार दिला. त्यानंतर डेविड मिलरच्या साथीने गुजरातला विजय मिळवून दिला. विजय संखर याने 29 धावांची खेळी केली. डेविड मिलर याने नाबाद 31 धावांची खेळी केली. साई सुदर्शन याने नाबाद 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान साई सदर्शन याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. या सामन्यात साई सुदर्शन याचे एकमेव अर्धशतक होय..
4/8
![प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दिल्लीने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 162 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून अक्षर पटेल याने दमदार फलंदाजी केली. अक्षर पटेलच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने 162 धावांपर्यंत मजल मारली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/e5db48cf698194cc79a5265dfc305af5c71ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद शामी आणि राशिद खान यांच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दिल्लीने निर्धारित 20 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 162 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून अक्षर पटेल याने दमदार फलंदाजी केली. अक्षर पटेलच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने 162 धावांपर्यंत मजल मारली.
5/8
![आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर युवा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने दमदार प्रदर्शन केले. अक्षर पटेल याने दिल्लीला जबरदस्त फिनिशिंग टच दिला. अक्षर पटेल याने धावांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत दिल्लीची धावसंख्या वाढवली. अक्षर पटेल याच्या खेळीमुळे दिल्लीचा संघ १५० धावसंख्या ओलाडंता आली. अक्षर पटेल याने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अक्षर पटेल याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/0cc2d0dcf42e6eb8e926c356ea24ad2d90d38.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर युवा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने दमदार प्रदर्शन केले. अक्षर पटेल याने दिल्लीला जबरदस्त फिनिशिंग टच दिला. अक्षर पटेल याने धावांचा पाऊस पाडला. अक्षर पटेल याने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत दिल्लीची धावसंख्या वाढवली. अक्षर पटेल याच्या खेळीमुळे दिल्लीचा संघ १५० धावसंख्या ओलाडंता आली. अक्षर पटेल याने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अक्षर पटेल याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
6/8
![दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सर्फराज खान संघर्ष करताना दिसले. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. डेविड वॉर्नर ३२ चेंडूत ३७ धावा काढून बाद झाला. तर सर्फराज खान याने ३४ चेंडूत ३० धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/1da45bd3b57b771c66eea55d50c6f9b4baeb4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सर्फराज खान संघर्ष करताना दिसले. दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली होती. पण मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. डेविड वॉर्नर ३२ चेंडूत ३७ धावा काढून बाद झाला. तर सर्फराज खान याने ३४ चेंडूत ३० धावांची खेळी केली. या दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले.
7/8
![गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची फलंदाजी ढासळली. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रीले रुसे यांना लौकिसास साजेशी खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ अवघ्या सात धावा काढून बाद झाला. तर रुसोला खातेही उघडता आले नाही. मिचेल मार्श अवघ्या चार धावा काढून बाद झाला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे दिल्लीची धावसंखेला खीळ बसली. अमन खान यालाही संधीचे सोने करता आले नाही. अमन खान आठ धावांवर बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/f6a7b4456cac0b1ca654ee50f4c0567b6263b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची फलंदाजी ढासळली. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रीले रुसे यांना लौकिसास साजेशी खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ अवघ्या सात धावा काढून बाद झाला. तर रुसोला खातेही उघडता आले नाही. मिचेल मार्श अवघ्या चार धावा काढून बाद झाला. लागोपाठ विकेट पडल्यामुळे दिल्लीची धावसंखेला खीळ बसली. अमन खान यालाही संधीचे सोने करता आले नाही. अमन खान आठ धावांवर बाद झाला.
8/8
![सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. मोहम्मद शामी, अल्जारी जोसेफ आणि राशिद खान यांनी भेदक मारा केली. मोहम्मद शामी याने तीन विकेट घेतल्या. राशिद खान यानेही तीन विकेट घेतल्या. अल्जारी जोसेफ याने दोन विकेट घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/04/54191cbc87e7109350185ad05fe52e6f2089e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. मोहम्मद शामी, अल्जारी जोसेफ आणि राशिद खान यांनी भेदक मारा केली. मोहम्मद शामी याने तीन विकेट घेतल्या. राशिद खान यानेही तीन विकेट घेतल्या. अल्जारी जोसेफ याने दोन विकेट घेतल्या.
Published at : 05 Apr 2023 12:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)