Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण
Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी घेतली अजित पवारांची भेट..जुन्नर बाजार समितीत अजित पवार आणि संदिप क्षीरसागर यांच्यात चर्चा
शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत गुप्त चर्चा केली. पुण्यातील जुन्नरमध्ये येऊन क्षीरसागर का भेटले असावेत? या भेटीत दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काही चर्चा झाली का? असे एकणानेक प्रश्न उपस्थित झालेत. मात्र या भेटीमागचं कारण अजित पवार आणि संदीप क्षीरसागर या दोघांनी ही सांगितलं. बीड सारख्या शहरात एकवीस दिवस पिण्याचं पाणी नाही अन म्हणून तो मला शोधत इथं आलाय, विरोधी पक्षाचा आमदार मला भेटला म्हणून कोणत्या ही ब्रेकिंग न्यूज चालवू नका. असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.

















