एक्स्प्लोर
In Pics : दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस, भारतज 19/0, 208 धावांनी पिछाडीवर
IND vs BAN : ढाका येथे सुरु दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला असून दिवस संपताना भारत 19 धावांवर शून्य बाद या स्थितीत 208 धावांनी पिछा़डीवर आहे.
Team India
1/10

भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यावर भारत आता दुसरा सामना खेळत आहे.
2/10

ढाका येथील शेर ए बांगला मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. 22 ते 26 डिसेंबर सामना चालणार आहे.
3/10

सामन्यात सुरुवातीला नाणेफेक जिंकून बांगलादेशनं फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला.
4/10

भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याला 12 वर्षानंतर कसोटी संघात आज स्थान मिळालं,
5/10

भारतीय गोलंदाजांनी आज कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला.
6/10

यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश 200 पार धावसंख्या पोहचवू शकला.
7/10

भारतीय गोलंदाजांनी आज सामन्यात सुरुवातीपासून कमाल कामगिरी केली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या.
8/10

तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाला सुरुवातीपासून धावा करण्यात अडचण येत होती.
9/10

मोमीनलने 84 धावा केल्या असल्या तरी काही खेळाडूंनी त्याला साथ दिल्याने 200 पार धावसंख्या जाऊ शकली.
10/10

सध्या भारत फलंदाजी करत असून केएल राहुल आणि शुभमन गिल फलंदाजी करत आहेत. 19/0 अशी भारताची स्थिती आहे.
Published at : 22 Dec 2022 06:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















