Kaka Pawar on Shivraj Rakshe : Maharashtra kesari आधीच ठरतो, कुस्तीपटू काका पवारांचा गंभीर आरोप
महाराष्ट्र केसरी आधीच ठरतो, अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू काका पवारांचा गंभीर आरोप, महाराष्ट्र केसरीच्या फायनलमधल्या पंचांना जन्मठेपेची शिक्षा देणार का? काका पवारांकडून सवाल उपस्थित
महाराष्ट्र केसरी आधीच ठरतो, ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवारांचा गंभीर आरोप
पंचांना जन्मठेपेची शिक्षा द्या, काका पवारांची मागणी
कुस्तीच्या आखाड्यात राजकारण करत कुस्ती संपविण्याचा घाट - काका पवार
महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण होणार हे आधीच ठरवलं जातं असा गंभीर आरोप, शिवराज राक्षेचे वस्ताद आणि अर्जुनवीर काका पवारांनी केलाय. शिवराज राक्षेवर निलंबनाची कारवाई केलीत आता पंचाला जन्मठेप देणार का असा संतप्त सवाल देखील त्यांनी विचारलाय. महाराष्ट्र केसरीच्या सामन्यात जेव्हा गदारोळ झाला, तेव्हा तिथे उपस्थित नेत्यांची नावं घेत काका पवारांनी काही प्रश्न विचारलेत. कुस्तीच्या आखाड्यात नेमकं राजकारण कुणी आणलं? राजकीय हस्तक्षेपामुळे पैलवान संपतोय की कुस्ती असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय.























