भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह याचा आज 42वा वाढदिवस आहे. भज्जीचा जन्म 3 जुलै 1980 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला होता. 25 मार्च 1998 रोजी भज्जीने ऑस्ट्रेलियाविरोधात भारताकडून पदार्पण केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भज्जीने राजकारणात प्रवेश केलाय.
2/6
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भज्जी सोशल मीडियावर सक्रीय आहे. भज्जी पत्नी गीता बसरा आणि मुलासोबत मुंबईमध्ये एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहतोय. हा सी-फेसिंग अपार्टमेंट आहे.
3/6
या घराला गीता बसराने डिजाइन केलेय. घराच्या इंटीरियरमध्ये लाइट शेड्सचा वापर करण्यात आलाय.
4/6
भज्जीच्या घरातील डायनिंग एरियाही शानदार आहे. तसेच बेडरुमही आलीशान आहे.
5/6
'टर्बनेटर' नावाने प्रसिद्ध असलेला हरभजन भारताकडून कसोटीत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होय. 11 मार्च 2001 रोजी कोलकातामध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात त्याने हा कारनामा केलाय.
6/6
2000 मध्ये भज्जीच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे त्याच्यावर घरातील जबाबदारी आली होती. त्यामुळे त्याने ट्रक ड्रायव्हर होण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर कुटुंबाच्या सल्ल्यानंतर क्रिकेटमध्ये करिअर केले.