एक्स्प्लोर
Ram Mandir | असं असणार राममंदिर, भूमिपूजनाआधी समोर आले मंदिराचं मॉडेल
1/7

अयोध्येत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम अवघ्या काही तासांवर आला आहे. अयोध्येच्या चौकाचौकात सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राममंदिराच्या या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत.
2/7

1988मध्ये तयार करण्यात आलेल्या मूळ आराखड्यानुसार, मंदिराची उंची 141 फुट एवढी ठेवण्यात आली होती. ती सुधारीत आराखड्यात वाढवून 161 फुट एवढी करण्यात आली आहे. सोमपुरा यांनी मंदिरा उभारण्यासाठी जवळपास साडेतीन वर्ष लागणार असल्याचं सांगितलं.
3/7

आज अयोध्येत राम मंदिराच्या भूमी पूजनाचा सोहळा रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. तसेच, याव्यतिरिक्त 175 लोकांना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
4/7

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराचं मॉडल जारी केलं आहे. जे दिसायला अत्यंत भव्या वाटत आहे.
5/7

सुधारित डिझाइननुसार, मंदिराची उंची 141 फुटांवरून वाढून 161 फुट एवढी करण्यात आली आहे. सोमपुरा यांनी पुढे बोलताना सांगितले की, मंदिराच्या डिझाइनमध्ये आणखी दोन मंडप जोडण्यात आले आहेत. तसेच नव्या डिझाइनमध्ये फक्त नवे मंडप जोडण्यात आले आहेत.
6/7

अयोध्येत उभारण्यात येणारं राम मंदि अत्यंत भव्य असणार आहे. मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट सी सोमपुरा यांचा मुलगा निखिल सोमपुरा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मंदिराचं आधीचं डिझाइन 1988 मध्ये तयार करण्यात आलं होतं. त्याला 30 वर्षांहून अधिक काळा लोटला आहे. या मंदिरात अनेक लोक येण्याची शक्यता आहे. देशभरातील भाविक मंदिराला भेट देण्यासाठी उत्सुक असतील. त्यामुळे आम्ही याचा आकार मोठा केला आहे.'
7/7

श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रने ट्वीट करत म्हटलं आहे की, 'श्री राम जन्मभूमी मंदिर भव्यता आणि दिव्यतेचं अद्वितीय कृतीच्या रुपात विश्वात ओळखलं जाणार आहे. मंदिराच्या आंतील आणि बाह्य रुपाचे काही फोटो.'
Published at :
आणखी पाहा























