एक्स्प्लोर
Sindhudugr News: सिंधुदुर्गात दुर्दैवी घटना, समुद्रात अख्खं कुटुंब बुडालं, चौघांचा मृत्यू!
Sindhudugr News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात काल नऊ पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Sindhudugr News
1/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटनासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील पिंगुळी आणि बेळगाव जिल्ह्यातील लोंढा येथील पर्यटकांवर काल काळाने घाला घातला.
2/7

तळकोकणातील शिरोडा वेळागर समुद्रात काल सायंकाळी ९ पर्यटक बुडाले. त्यातील एक पर्यटक स्वतः बाहेर आला, तर एका जणांला वाचवण्यात यश आलं.
3/7

इतर आठ पर्यटकांपैकी एकाला वाचवण्यात आले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले. तर तीनजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
4/7

आज सकाळी शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांपैकी अजून एकाचा मृतदेह आरवली सागरतीर्थ येथे सापडला. लोंढा-बेळगाव येथील कित्तुर कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत.
5/7

इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष १७. रा. लोंढा, बेळगाव या तरुणीला समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.
6/7

फरहान इरफान कित्तूर, लोंढा-बेळगाव, इबाद इरफान कित्तूर , लोंढा-बेळगाव आणि नमीरा आफताब अख्तर ल, रा. अल्लावर, बेळगाव ह्या तिघांचा मृत्यू झाला आहे.
7/7

बेपत्ता झालेले पर्यटक: इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, लोंढा-बेळगाव इक्वान इमरान कित्तूर, लोंढा-बेळगाव ,फरहान मोहम्मद मणियार, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ,जाकीर निसार मणियार, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.
Published at : 04 Oct 2025 11:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























