ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं,ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय, केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत नसेल, तुम्ही मुख्यमंत्री गृहमंत्री या नात्यानं ठोस कृती करा, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र https://tinyurl.com/y53eyuky हरवलेली 90 टक्के लहान मुलं पकडली जातात, देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंना उत्तर https://tinyurl.com/5xtj95hf
2. मुंढवा जमीन प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणे, चुकीच्या बाबी असल्याचे लक्षात आल्यानंतर भूमिका घेणे अपेक्षित होतं, अजित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/y8jnpdw6 पार्थ पवार काही कुकूला बाळ नाही आणि त्यांनी जे केली ती चूक नाही, हे फ्रॉड आहे, अंजली दमानियांकडून अधिकाऱ्यांचा बचाव https://tinyurl.com/4nyfhy5v
3. सिडकोच्या घरांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, ईडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गातील अर्जदारांना फायदा, 17 हजार घरांच्या किंमती कमी होणार https://tinyurl.com/2x4vrtxe म्हाडामध्ये रॅकेट कार्यरत, बिल्डर परस्पर घरं घेऊन बाहेर विकतात;शशिकांत शिंदेंचा मोठा आरोप https://tinyurl.com/vjzmsssc
4. मी मुलीचा बाप,मालेगावच्या तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या; सुहास कांदेंनी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना धारेवर धरलं https://tinyurl.com/4hc226dp
5. आता संघर्ष थांबायला हवा, रायगडचा राजकीय वणवा शमवण्यासाठी अजित पवार मैदानात; तटकरे-गोगावले वाद थांबवण्यासाठी अजित पवार यांची भरत गोगावले-उदय सामंत यांच्यासोबत बैठक https://tinyurl.com/4nctfmh6 दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढं यायला तयार , मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/22cttr64
6. पुण्यात 50 हजार कोटींचे रस्ते प्रकल्प, 16000 कोटींच्या सुस्साट रस्त्याने दोन तासांत छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा https://tinyurl.com/3nky2hrj
7. सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका, बँक्स असोसिएशनची याचिका फेटाळली, 10 वर्षांपेक्षा अधिक काळ संचालक असणाऱ्यांना फटका, मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय https://tinyurl.com/24822u5u नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध https://tinyurl.com/88mycv3p
8. पुण्याच्या थेऊरमधील यशवंत साखर कारखान्याच्या 299 कोटींच्या जमीन व्यवहाराला ब्रेक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती https://tinyurl.com/bdhe6e3c
9. लिओनेल मेस्सीचं कोलकात्याच्या सॉल्ट लेक मैदानात भव्य स्वागत, मेस्सी काहीच मिनिटांत मैदानातून निघाताच तुफान राडा, हजारो रुपये मोजून मेस्सी न दिसल्यानं प्रेक्षक मैदानात घुसले, बाटल्या अन् खुर्च्या फेकत गोंधळ https://tinyurl.com/bde2jknx मेस्सीच्या कार्यक्रमातील अभूतपूर्व राड्यानंतर पोलिसांनी आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे परत करण्याचा निर्णय https://tinyurl.com/8jpc62c6
10. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, आसाम क्रिकेट असोसिएशनकडून चार खेळाडू तात्काळ निलंबित, भारतीय क्रिकेटविश्वात खळबळ https://tinyurl.com/4y9rtts6
एबीपी माझा स्पेशल
Kolhapuri Chappal:राजेंद्र शिंदेंनी बनवली तब्बल 51 हजारांची 'कोल्हापुरी चप्पल'! काय आहे वैशिष्ट्य? https://tinyurl.com/ubx4vwur
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























