Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Lionel Messi India Visit : मेस्सीने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत फुटबॉल खेळला तर राहुल गांधींना जर्सी भेट दिली. हैदराबादमध्ये मेस्सीने चाहत्यांची मने जिंकली.

हैदराबाद : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी (Lionel Messi) तब्बल 14 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आला असून, त्याचा अनुभव मात्र दोन शहरांत पूर्णपणे वेगळा ठरला. कोलकाता (Kolkata) येथे गोंधळामुळे त्याला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. तर हैदराबाद (Hyderabad) मध्ये मात्र मेस्सी चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि सन्मान अनुभवताना दिसला.
कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियम (Salt Lake Stadium) येथे निर्माण झालेल्या अराजक परिस्थितीमुळे मेस्सी अवघ्या 22 मिनिटांत मैदान सोडून निघून गेला. त्यामुळे कोलकाता दौऱ्याच्या आठवणी फारशा सुखद राहिल्या नाहीत.
हैदराबादमध्ये शानदार स्वागत (Hyderabad Event)
हैदराबादमध्ये मात्र चित्र वेगळे होते. येथे मेस्सीने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांच्यासोबत मैदानात फुटबॉल खेळला. तसेच, मुलांसोबत खेळत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. मेस्सीसोबत लुईस सुआरेझ (Luis Suarez) आणि रोड्रिगो डी पॉल (Rodrigo De Paul) हेही उपस्थित होते.
"𝐌𝐞𝐬𝐬𝐢, 𝐰𝐞𝐥𝐜𝐨𝐦𝐞 𝐭𝐨 𝐓𝐞𝐥𝐚𝐧𝐠𝐚𝐧𝐚! 𝐓𝐞𝐥𝐚𝐧𝐠𝐚𝐧𝐚 𝐢𝐬 𝐑𝐢𝐬𝐢𝐧𝐠!"
— Revanth Reddy (@revanth_anumula) December 13, 2025
𝐌𝐞𝐬𝐬𝐢 𝐌𝐚𝐠𝐢𝐜 𝐢𝐧 𝐇𝐲𝐝𝐞𝐫𝐚𝐛𝐚𝐝 💫#GOATIndiaTour #Messi #MessiInIndia #TelanganaRising2047 pic.twitter.com/b0RzV3ARqK
राहुल गांधींना दिली जर्सी (Rahul Gandhi Jersey)
या कार्यक्रमादरम्यान मेस्सीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना स्वतःची फुटबॉल जर्सी भेट दिली. राहुल गांधी यांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर शेअर केले असून, ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
चाहत्यांसोबत संवाद आणि निरोप (Fans Interaction)
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Rajiv Gandhi International Stadium) उशिरा पोहोचलेल्या मेस्सीने चाहत्यांना हात हलवत अभिवादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्याने आयोजकांना अर्जेंटिना संघाची जर्सी भेट दिली आणि स्पॅनिश भाषेत चाहत्यांचे आभार मानले.
दरम्यान, कोलकात्यात घडलेल्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोशल मीडियावरून मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांची माफीही मागितली आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा:























