Dombivli Pollution : गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
गुलाबी रस्ता आणि डोंबिवली लाले लाल.. असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय... याचं कारण आहे अर्थातच डोंबिवली एमआयडीसीतलं रासायनिक प्रदूषण. कधी हिरवा पाऊस, कधी कारखान्यातले स्फोट तर कधी गुलाबी रस्ते, डोंबिवलीकरांनी न मागताही या एमिनिटीज त्यांना पुरवल्या जात आहेत. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत, अशावेळी 24 बाय 7 (Twenty Four By Seven) राजकारणात अडकलेल्या नेेतेमंडळींना सामान्य नागरिकांच्या या अतिसामान्य तक्रारी सोडवायला वेळ मिळेल का? पाहुयात
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणचा मुद्दा आला पुढे..
पुन्हा एकदा रस्ता झाला गुलाबी...
एमआयडीसी फेज 2 मधील प्रकार...
एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष..
रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीत चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. डोंबिवली एमआयडीसीत अनेक रासायनिक कंपन्या असून यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत हिरवा पाऊस, ऑरेंज ऑईल मिश्रित पाऊस पडला होता.तर आता केमिकलमुळे एमआयडीसी सम्पर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झाला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणात गटारात केमिकल असल्याचे ही दिसून आले आहे.या केमिकल मुळे दर्प सुटला आहें, असे स्थानिकांनी सांगितले. 2020 साली हाचं गुलाबी रस्ता विषय लावून धरला होता, त्यामुळे तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती. आता 5 वर्षानी पुन्हा हा विषय पुढे आला असून अधिकारी वर्ग लक्ष देणार कां?
All Shows

































